Share

उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या निशाण्यावर; आता मनसेला दिला ‘हा’ मोठा धक्का

एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यापासून त्यांच्या गटात येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे अनेक नेते शिंदे गटात आणि भाजपमध्ये जाताना दिसत आहे. असे असतानाच आता मनसेलाही याचा मोठा धक्का बसणार आहे.

रायगड जिल्ह्यातील मनसेचे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील हे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहे. रुपेश पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून मनसेसोबत आहेत. ते पक्षामध्ये खुप सक्रिय सुद्धा आहेत. मध्य रायगडमध्ये त्यांनी पक्ष वाढीसाठी अनेक कामे केली आहे.

पक्षाचे ध्येय धोरण तसेच संपुर्ण माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम प्रामाणिकपणे रुपेश पाटील यांनी केले आहे. पण आता तेच रुपेश पाटील हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा मनसेसाठी मोठा धक्का असणार आहे.

रुपेश पाटील यांनी रायगड येथील मनसे पक्षातील गडबाजीला कंटाळून पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मनसे पक्षात अंतर्गत गटबाजी सुरु आहे. गटबाजीमुळेच अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. या सर्व गोष्टींना रुपेश पाटीलही कंटाळले आहे.

रुपेश पाटील हे रायगडमधील मनसेचे महत्वाचे नेते आहे. त्यांचा रायगडमधील जनसंपर्क सुद्धा खुप चांगला आहे. ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. जर रुपेश पाटील हे शिदे गटात गेले तर मनसेला हा रायगडमध्ये मोठा धक्का असेल.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेना नाव आणि चिन्ह आलं आहे. त्यामुळे अनेक नेते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करत आहे. मनसेचे पदाधिकारी देखील एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मानताना दिसत आहे. तसेच आता चिन्ह आणि नाव आल्यामुळे आणखी नेते त्यांच्या पक्षात प्रवेश घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदेंनाच का मिळाले? ‘हे’ भलतेच पाच मुद्दे आयोगाने घेतले विचारात
शरद पवारांनी एका वाक्यातच काढली निवडणूक आयोगाच्या निकालाची हवा अन् वाढले भाजपचे टेंशन
कसब्यात बापट व्हिलचेअरवरून प्रचाराला येताच प्रतिस्पर्धी उमेदवार गहीवरला; थेट माघारच घेतली

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now