संभाजीराजे यांनी आपण राज्यसभा निवडणूकीची सहावी जागा अपक्ष लढवणार असे स्पष्ट केले होते. शिवसेना संभाजीराजेंना राज्यसभेजी उमेदवारी देईल अशी चर्चा होती, पण शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली. त्यामुळे संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले जात होते. (mns leader challenge uddhav thackeray)
संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. त्यानंतर आज संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याला दिलेला शब्द मोडला अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी निवडणूकीत माघारही घेतली आहे.
संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. भाजप नेत्यांसह आता मनसे नेतेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसून येत आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत, असे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे.
https://twitter.com/GajananKaleMNS/status/1530076353617350661?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530076353617350661%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fpolitics%2Fmns-leader-gajanan-kale-tweet-on-sambhaji-raje-chatrapati-and-shivsena-cm-udhhav-thackeray-au138-719696.html
तसेच चोरसेना आता खोटीसेना म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बेतात. भावाबद्दल कूटनिती करणाऱ्यांकडून राजेंना फसवले म्हणून काय आश्चर्य वाटून घ्यायचे? महाराष्ट्र आणि मराठा समाजाने ही जखम विसरता कामा नये. हिम्मत असेल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ येवून सांगा की आम्ही राजेना शब्द दिला नव्हता, असे ट्विटही गजानन काळे यांनी केले आहे.
https://twitter.com/GajananKaleMNS/status/1530084318302851072
दरम्यान, राज्यसभेबाबत आमच्यात चर्चा झाली होती. सर्व गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाला होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला. तसेच माझा एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर उभे राहून उद्धव ठाकरेंनी सांगावे की मी खोटं बोलत आहे, असे संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
संभाजीराजेंचं आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून दाखवावं, मग कळेल कुणी खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील
सेटवरच जेठालाल आणि बबिताजींचा झाला होता वाद, पण खऱ्या आयुष्यात ‘असे’ आहे दोघांचे नाते
भाजपकडून सदाभाऊ खोतांना डच्चू? विधान परिषद निवडणूकीत विश्रांती घेण्याचा सल्ला