राज्यात सत्ता जरी महाविकास आघाडीची असली तरी त्यांच्या नेत्यांमध्ये अनेकदा कुरबुरी सुरु असतात. आताही एक वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक मोठे वक्तव्य केले होते. पुढच्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. (mns angry on sanjay raut)
सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मोठे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून तेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आता संजय राऊतांच्या या वक्तव्यावरुन मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी टीका केली आहे. शिवसैनिकांनो तुम्ही काळजी घ्या आणि या लाचार संजय राऊतांना आवरा अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे. सध्या गजानन काळेंचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.
संजय राऊत म्हणतात पुढची २५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार, तर दुसरीकडे तुळजा भवानीला जाऊन सुप्रिया ताई म्हणतात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे मी नवस फेडायला येईल. त्यामुळे राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री नकोय, असं वाटतंय, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
तसेच पुढच्या काही दिवसात सुप्रिया ताई या पहिल्या मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होताय की काय? असं चित्र शिवसैनिकांनी पाहणं एवढंच राहिलं आहे. शिवसैनिकांनो काळजी घ्या आणि या लाचार संजय राऊतांना आवरा, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी तुळजापुरच्या तुळजा भवानी मातेचे दर्शन घेतले होते. तसेच राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला, तर संपूर्ण पक्ष घेऊन दर्शनाला येईल, असा नवस सुप्रिया सुळेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोण आहे नताशा जिच्यावर फिदा झाला गुजरात टायटन्सचा कर्णधार पंड्या? अनेक चित्रपटात केलं आहे काम
‘या’ गोष्टींमध्ये धोनीच्याही पुढे निघून गेला हार्दिक पंड्या, रोहित शर्माचाही रेकॉर्ड धोक्यात
VIDEO: माफी मागा नाहीतर.., हनुमान जन्मस्थळावरून दोन साधूंमध्ये राडा, भर सभेत उगारला माईक