mns angry on bhagatsigh koshyari | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. अनेकदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य केली आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्राबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. अशात ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. औरंगाबाद येथे शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लीट पदवी देण्यात आली आहे. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. या वादग्रस्त विधानामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता मनसेने सुद्धा भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांनी एक फेसबूक पोस्ट करत भगतसिंग कोश्यारी यांना सुनावले आहे. याचं नाव भगतसिंग नाही कळीचा नारद पाहिजे होतं, आमच्या राजांचा एकेरी उल्लेख ना मग तु कोण लागून गेलाय? असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. आजच्या नेत्यांची तुलना ही थेट शिवाजी महाराजांशी करणं हे खुप चुकीचं असल्याचे काहींनी म्हटले आहे.
यापूर्वी देखील भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्तांना लहान दाखवत नाही. पण ज्याप्रमाणे आईचं मोठं योगदान असतं. तसंच गुरुचंही मोठं योगदान असतं.
https://www.facebook.com/vasantmore88/posts/pfbid02fPByPNPfD82AbAseFjEXrTQTwVeU3NFvMKp7ZQTBcCYSrRNzJb67HqVSbQETEL7Fl
महत्वाच्या बातम्या-
ranjit savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातवाचे पंडीत नेहरुंवर गंभीर आरोप; म्हणाले, एका बाईमुळे त्यांनी…
tabassum : धक्कादायक! बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकारच्या झटक्याने निधन
satya manjrekar : लोक म्हणाली याला नाच्याची भूमिका द्या तर भडकला सत्या मांजरेकर; आता जिममध्ये गाळतोय घाम