शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४१ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. (mla sanjay shisat letter to uddhav thackeray)
एकनाथ शिंदे यांच्या या मोठ्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यातील अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. त्यामुळे ते पुन्हा येतील याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीये.
बंडखोरीनंतर आमदार सुद्धा प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. आम्ही आतापर्यंत शिवसेनेत होतो, पण तुम्ही आतापर्यंत आम्हाला कधीही मोकळेपणाने भेटू दिलं नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
तुमच्या बंगल्याची दारं सर्वसामान्यांसाठी कधीच खुली नव्हती. काल खऱ्या अर्थानं वर्षा बंगल्याची सर्वसामान्यांसाठी खुली झाली. लोकांमधून निवडून येणाऱ्या आणि विधान परिषद, राज्यसभेवरील बडव्यांची आम्हाला मनधरणी करावी लागत होती, अशी खंतही संजय शिरसाट यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1539863093571792896
आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहे. या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडले आहे. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, असे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
ज्यांना जायचंय त्यांनी जा…’ मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर ‘हे’ ६ आमदार शिंदे गटात दाखल
तरुणांनो लक्ष द्या! बाप होण्यासाठी ‘हे’ आहे योग्य वय, त्यानंतर शुक्राणू होऊ लागतात डॅमेज
उद्धव ठाकरेंसाठी ममता बॅनर्जी मैदानात? गुवाहाटीतील हॉटेलवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांची धडक