राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन वाद सुरु आहे. या वादात भाजपचे अनेक नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसून येत आहे. त्यात भाजप नेते नितेश राणे यांचे नावही चर्चेत आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. (mla nitesh rane ban this villege)
आता नितेश राणे पुन्हा एकदा चर्चेत आले, पण यंदाचे कारण जरा वेगळे आहे. एका गावातील सभेत त्यांनी गावाबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे याप्रकरणी गावकऱ्यांनी निषेध नोंदवला आहे, तसेच त्यांनी नितेश राणेंविरोधात बॅनरही लावले आहे.
कमळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नितेश राणे यांनी एका गावाबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर आता गावकऱ्यांनी नितेश राणेंना गावात प्रवेश बंदी केली आहे. तसेच याबाबतचे बॅनरही लावण्यात आले आहे. सिंधुदुर्गात हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे.
आनंदवाडी हे नितेश राणे यांच्या मतदार संघातील गाव आहे. हे गाव देवगड तालुक्यात आहे. या गावात नितेश राणेंकडून कमळ चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गावाबद्दल बोलताना तरुण चोरामाऱ्यांच्या प्रकणात असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांनी लावलेल्या बॅनरवर २२ एप्रिलला रात्री आनंदवाडी गावाची बदनामी कऱणारे वक्तव्य नितेश राणे यांनी म्हटले आहे. यावेळी गावकऱ्यांनी निषेध व्यक्त करत नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गावात प्रवेश बंदी असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, गावकऱ्यांच्या या निषेधावर आता नितेष राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली होती. कमळ चषक स्पर्धेच्या भाषणावरुन सगळ्यांनी गैरमसज करुन घेतला आहे. मी जो काही चोरीचा आरोप केला आहे. त्यात काही मुले आनंदवाडीतील आणि काही मुले कणकवणीतील आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
राजकारणात खळबळ! मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा; ‘या’ मागणीसाठी थेट मंत्रालयात धडक
ठाकरेंनी मोदींना प्रत्यूत्तर देताच फडणवीस प्रचंड संतापले; लागोपाठ तीन ट्विट करत म्हणाले…
किळसवाणे! ३० वर्षांपासून रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये बनवला जातोय समोसा, अधिकाऱ्यांनाही बसला धक्का