Politics: पारनेरचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanka) सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नीलेश लंके हे पुर्वी शिवसेना (Shivsena) गटात होते. त्यानंतर लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला. नीलेश लंके यांना पवार कुटुंबियांचे सर्वात जवळचे व्यक्ती मानले जातात.
नीलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते आमदार झाले. नुकतेच काही दिवसांपूर्वी शरद पवार नगर दौर्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पारनेरमधील लंके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. लंके यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर आपले मत व्यक्त केले आहे.
नीलेश लंके म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे परिस आहेत. त्यांच्या संपर्कात पूर्वीच आलो असतो, तर केव्हाच आमदार झालो असतो. पवार कुटुंबियांनी सांगितले तर मी कोरड्या विहिरीत उडी मारेल.
तसेच, शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मला भरभरुन प्रेम दिले आहे. ते सोबत असतील तर मी लोकसभेच्या रिंगणात उतरु शकतो. आणि यांच्याबरोबर राहूनच राजकारण करण्याची आपण मर्यादा ठरवून घेतली आहे, असे नीलेश लंके म्हणाले.
यादरम्यान, पवारसाहेबांच्या विचाराला अनुसरून राजकारणाला समाजकारणाची जोड देत हजारो लोकांच्या आधार देण्याचे काम केले आहे. आतापर्यंत लंके स्वतः साठी कधीही जमला नाही. मिळाणारे सगळे पैसे गरजू विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी वापरले जातात. आमदार झाल्यावर मी बदलो नाही आणि कधीही बदलनार नाही, असे आश्वासन लंके यांनी दिले आहे.
दरम्यान, गेल्या काही काळापासून नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लंके यांचे नाव पुढे येत आहे. नगरसेवक, आमदार, खासदार म्हटलं की त्यांची घरेही आलिशान असतात. मात्र अत्यंत साधे राहणीमान असलेले आमदार निलेश लंके यांचं घरंही तसेच साधे आहे.
महत्वाच्या बातम्या






