mla mukta tilak pass away | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार होत्या. आज पुण्यात त्यांचे निधन झाले आहे. त्या ५९ वर्षांच्या होत्या.
मुक्ता टिळक यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता वैकूंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांनी त्यावर उपचार घेण्यास सुरुवात केली होती. पण त्यांची ही झुंझ अपयशी ठरली आहे. आज दुपारी ३.३० वाजता गॅलक्सी रुग्णालयामध्येच त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मुक्ता टिळक या पुणे महानगरपालिकेत सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. अडीच वर्षे त्यांनी पुण्याचे महापौर म्हणूनही काम केले होते. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर त्या भाजपच्या पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या पहिल्या महापौर होत्या.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत मुक्ता टिळक या कसबा मतदार संघाच्या आमदार झाल्या. लोकमान्य टिळकांच्या त्या नातसून होत्या. भाजपच्या अभ्यासू नेत्यांपैकी त्या एक होत्या. त्यांनी कसबा मतदार संघातही चांगला प्रभाव पाडला होता.
मुक्ता टिळक यांना भाजपच्या फायटर आमदार म्हणून ओळखलं जात होतं. कर्करोग झालेला असतानाही त्या पुण्याहून मुंबईला राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीत मतदानासाठी आल्या होत्या. त्यामुळे त्यांचे कौतूकही करण्यात आले होते. कर्करोगामुळे त्या लोकांमध्ये कमी जात होत्या. पण त्या रुग्णालयात राहून लोकांची कामे करत होत्या.
महत्वाच्या बातम्या-
corona : देशात पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ सुरू; तिसरी लाट येणार का? तज्ञ म्हणाले लाट तर येणारच, पण…
bjp : ऑफर शिंदे गटाची पण पक्षप्रवेश भाजपात, ऐनवेळी फडणवीसांनी केली खेळी अन् शिंदेंवरच उलटवला डाव
raj thackeray : वसंत मोरेंच्या नाराजीवर भडकले राज ठाकरे? म्हणाले, माध्यमांसमोर गरळ ओकू नका, नाहीतर…