Share

राज्यसभेसाठी राजकीय पक्ष पाण्यासारखा खर्च करताहेत पैसा , हॉटेलांचं भाडं पाहून डोळे पांढरे होतील

सध्या राज्यसभेची सहावी जागा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत सहा जागा असताना भाजपने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक-एक उमेदवार उतरवला आहे. या निवडणूकीत सहाव्या जागेसाठी भाजप-शिवसेना यांच्या चुरस पाहायला भेटणार आहे. (mla five stars hotel one day bill)

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपलाच विजय होणार असा दावा करताना दिसून येत आहे. सहावी जागा कोण जिंकणार हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच या निवडणूकीत कोणताही आमदार फुटू नये, त्यासाठी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेच्या आमदारांना आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर भाजपच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच काँग्रेसनेही आपल्या आमदारांसाठी फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले आहे. येत्या १० जूनपर्यंत या आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्येच असणार आहे.

राज्यसभेचा एक उमेदवार निवडूण आणण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून ते आमदारांवर पाण्यासारखा पैसा वाहताना दिसून येत आहे. या हॉटेलांचं भाडंही खुप असून त्याचा खर्चही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. आता आपण तेच जाणून घेणार आहोत.

हॉटेल ट्रायडंटचं एकदिवसाचं भाडं-
सुप्रिअर रुम – सिंगल -१८,५०० रुपये, तर डबल-२० हजार
प्रिमिअम रुम- सिंगल २२ हजार, डबल २३ हजार ५०० रुपये
प्रिमिअम ओशन व्ह्यु रुम- सिंगल-२३ हजार ५०० रुपये, तर डबल २५ हजार
प्रेसिडेंटल सुट- ३ लाख रुपये

ताज हॉटेलचं एकादिवसाचं भाडं-
लक्झरी रुम- २२ हजार रुपये
लक्झरी ग्रँड (सिटी व्ह्यु)- २५ हजार रुपये
लक्झरी ग्रँड (सी व्ह्यु)- २७ हजार ५०० रुपये
ग्रँड लक्झरी रुम- १ लाख ६ हजार रुपये

आता तीन दिवस हे आमदार या हॉटेलमध्ये राहणार आहे. त्यामुळे पक्षाचे एका आमदारामागे हजारो रुपये खर्च होणार आहे. महाविकास आघाडीचे १४५ आमदार आहे, तर भाजपचे ११५ आमदार आहेत. एकीकडे महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर या आमदारांवर लाखोंनी खर्च केला जात आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुसेवालाची हत्या करणारे शुटर पुण्यातले सराईत गुन्हेगार, एकाने १६ व्या वर्षीच केलाय सरपंचाचा हाफमर्डर
सोनाक्षी सिन्हा पडलीये झहीर इक्बालच्या प्रेमात, पोस्टवर कमेंट करत म्हणाली, लव्ह यू… ; जाणून घ्या कोण आहे तो…
सिद्धू मुसेवालाच्या आठवनीत नायजेरियन रॅपरने केले असे काही की…; किस्सा वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now