राज्यात सध्या भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने नवं सरकार स्थापन केलं आहे. यामुळे सध्या शिंदे गटात आणि भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या गाड्यांचे होणारे अपघात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून तीन बंडखोर आमदारांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईतील ‘फ्री वे’ वर आज सकाळी शिवसेनेचे (Shivsena) महाडचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह राज्यात खळबळ उडाली आहे.
वाचा कसा झाला अपघात..?
मुंबईतील निवासातून मंत्रालयाच्या दिशेने भरत गोगावले जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका मागोमाग एक अशा एकूण सात वाहनांचा हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
मात्र वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघाताबाबत खुद्द आमदार गोगावले यांनी सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, एक टॅक्सी बिघडलेली होती आणि त्या टॅक्सीला एकामागेएक अशा एकूण आठ गाड्या आदळल्या. आमच्या गाडीपुढे पोलिसांची गाडी होती.
त्यानंतर आमची गाडी होती. एकमेकांवर जवळजवळ आठ गाड्या आदळल्या आणि त्यात गाडीचे नुकसान झाले, असं आमदार गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी काहीही काळजी करण्याचं कारण नाही, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
दरम्यान, अलीकडेच मुंबईतील आकाश केंद्राच्या मार्गावर शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला होता. याचबरोबर आमदार शहाजी पाटील हेही एका दुर्घटनेतून बचावले. तसेच आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला देखील अपघात झाला होता. सेव्हनहिल उड्डाणपुलावर माध्यमाच्या गाडीचालकाने अचानक ब्रेक लावला.
यामुळे पाठीमागून वेगात येणारी शिरसाट यांची गाडी येऊन त्यावर धडकली होती. त्या अपघातात शिरसाट यांच्या गाडीच मोठं नुकसान झालं. तर आता गोगावले यांच्या कारला मुंबईतल्या फ्री वे ब्रीजवर वाडीबंदर जवळ अपघात झाला. शिंदे गटातील आता पर्यंत 3 आमदारांच्या गाड्यांचा अपघात झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?