Share

शिंदे गटानं शिवसेनेचा डाव उलटवला; आता झिरवळ बंडखोरांची आमदारकी रद्द करूच शकत नाहीत

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारलाही धोका निर्माण झाला आहे. हे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे. (mla baldi and agrawal on ziraval)

शिवसेनेने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही मागणी शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता होती.

अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल हे शिंदे गटासाठी धावून आले आहे. झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव यापूर्वीच दाखल केला असल्याने त्यांना आमदारांना अपात्र करता येणार नाही, असे पत्र दोन्ही आमदारांनी दिले आहे.

भारतीय राज्यघटनेतील कलम १७९ आणि महाराष्ट्र विधानसभा नियम ११ नुसार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना हटवण्याची नोटीस आधी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर साधलेला डाव शिवसेनेवरच उलटला आहे, असे म्हटले जात आहे.

विधानसभा उपाध्यक्षांवरच अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना ते इतर सदस्यांना अपात्र ठरवू शकत नाही, असे बालदी आणि अग्रवाल यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ७ (३)(ब) नुसार सदस्यांना आपली बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत द्यायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.

कायदे वेगळे आहेत. असे असतानाही झिरवळ यांनी सदस्यांना अपात्र ठरवलं तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल. . त्यामुळे उपाध्यक्षांनी सदस्यांना अपात्र ठरवण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ चार नेत्यांमुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याचा निर्णय बदलला, जाणून घ्या
VIDEO: बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, कुर्ल्यातील ऑफिस फोडले
मोठी बातमी! गुवाहाटीत आसाम पोलिसांकडून शिवसेना नेत्याला अटक

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now