bacchu kadu : ‘पहिली वेळ माफ आहे, पण…,’ बच्चू कडूंनी शेलक्या शब्दात रवी राणांना घेरले

bacchu kadu : शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी जाहीर मेळाव्यात भाजप आमदार रवी राणा यांना लक्ष्य केल आहे. यामुळे राणा यांनी देखील दिलगिरी व्यक्त करत वाद संपवला असला तरी देखील कडू हे अजूनही आक्रमक असल्याच पाहायला मिळाल आहे.

रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी राणा यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला. ‘आमच्या वाटेला जाणाऱ्यांना सोडणार नाही,’ असा इशारा कडू यांनी दिला.

या मेळाव्यात बच्चू कडूंनी रवी राणा यांना पहिलीच वेळ होती म्हणून माफ करतोय, पण यापुढे अशी आगळीक घडली तर पुन्हा माफी नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे. प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नसून लढवय्यांचा पक्ष आहे. आम्ही कोणाच्या वाटी जात नाही. पण आमच्या वाटेला जाणाऱ्याला सोडत नाही म्हणत त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली.

पुढे बोलताना कडू यांनी म्हंटलं आहे की, राणांनी झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्ती केली त्याचा मी आनंद व्यक्त करतोय. नाहीतर उगाच आम्हाला हातपाय हलवायला लागले असते. त्यांनी मोठेपणा घेतला आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. तुम्ही दोन पावलं मागे घेतली तर आम्ही चार पावलं मागे घेऊ.’

दरम्यान, कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे काय आम्ही स्वस्त नाहीये. पहिली वेळ आहे माफ आहे. आगे कुछ करेगा और कोईभी करेगा ना… मग प्रहारचा वार काय असतो हे तुम्हाला सांगू, असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

पुढे बोलताना कडू यांनी म्हंटलं आहे, ‘सत्तेसाठी कधीही लाचारी केली नाही. सत्ता आणि पदापेक्षा माझ्यासाठी माझी लोकं महत्त्वाची आहेत. मी महात्मा गांधी यांना मानतो. मात्र माझ्या डोक्यात भगतसिंग आहेत, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी विचारपूर्वक बोलावे असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर