सध्या राज्यभरात राज्यसभेच्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणूकीसाठी राज्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणूकीत भाजपनेही आता त्यांचा तिसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे. (mla arun niture offer safari)
संभाजीराजे यांनी या निवडणूकीत अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांना शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी या निवडणूकीतून माघार घेतली होती. शिवसेनेने त्यांच्याऐवजी कोल्हापूरच्या संजय पवार यांची राज्यसभा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी महाविकास आघाडीने ६ उमेदवार दिले आहे. त्यात महाविकास आघाडीकडे ३ उमेदवार निवडून येतील इतकी मते आहे. अशात भाजपनेही ३ उमेदवारी देऊन राज्यसभेच्या निवडणूकीत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस पाहायला मिळणार आहे.
अशात या निवडणूकीत एक आमदार चांगलाच चर्चेत आला आहे. या निवडणूकीत एक आमदार अपक्ष उमेदवार उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याने एक मोठी घोषणाही केली आहे. जो कोणी मला पाठिंबा देईल त्याला माझ्याकडून एक सफारी भेट, अशी घोषणा त्याने केली आहे.
राष्ट्रीय किसान बहूजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे यांनी राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. अरुण निरुटे म्हणाले की, पक्षाच्यावतीने राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. सर्व आमदारांनी आम्हाला सहकार्य करावं. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदाराने मतदान करावं, असे आवाहन निटुरे यांनी केले आहे.
मला सहकार्य करुन संसदेत पाठवावं. जे मला पाठिंबा देतील त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. तसेच त्या आमदारांना आम्ही पक्षाच्यावतीने सफारी गाडी भेट देऊ. यासाठी ४५ वाहनांचे कोटेशन काढण्यात आले आहे. त्याची किंमत जवळपास ११ कोटी आहे. गरीब शेतकऱ्याचा मुलगा संसदेत पाठवावं ही हात जोडून विनंती, असेही अरुण निटुरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या; गोपीचंद पडळकरांचे पवारांवर पुन्हा गंभीर आरोप
दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय
भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाल्या “तुमच्यात तेवढी…”