Share

मंचावर मोदींसमोरच एमके स्टॅलिन यांनी भाजपवर केले गंभीर आरोप, भाजपने ‘असे’ दिले प्रत्युत्तर

तामिळनाडूमध्ये डीएमकेचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) पहिल्यांदाच चेन्नईला पोहोचले होते. येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन स्टेज शेअर करत होते. आपल्या भाषणादरम्यान एमके स्टॅलिन ( MK Stalin) यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करत अनेक आरोप केले. तमिळ भाषेशी भेदभाव केल्याचा आरोपही त्यांनी केला, ज्याला पंतप्रधान मोदींनी मंचावरच उत्तर दिले.(Prime Minister Modi, MK Stalin, Central Government, BJP)

तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अण्णामलाई यांनीही एमके स्टॅलिन यांना प्रत्युत्तर दिले आणि सांगितले की, त्यांच्या वागण्यामुळे त्यांना खूप लाज वाटते. अण्णामलाई म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आले होते. हा भाजपचा कार्यक्रम नव्हता. आमच्या मुख्यमंत्र्यांनी नम्रता दाखवायला हवी होती पण त्यांनी अभद्रता दाखवली.

एमके स्टॅलिन म्हणाले की, पंतप्रधानांनी कचाथीवू बेट परत आणावे. हे बेट भारताने श्रीलंकेला भेट म्हणून दिले होते. यावर अण्णामलाई यांनी ट्विटरवर उत्तर दिले की, आमच्या मुख्यमंत्र्यांना कचाथीवू बेट परत यावे असे वाटते पण ते हे विसरतात की १९७४ मध्ये इतर कोणी नाही तर श्रीमती इंदिरा गांधींनी ते श्रीलंकेला भेट दिले होते. डीएमके आणि काँग्रेस युती करतात आणि मिळून जनतेची लूट करतात आणि आता अचानक काय झालं?

एमके स्टॅलिन म्हणाले की, राज्य सरकारांना जनतेची सेवा करता येऊ नये, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. तामिळनाडू सरकारला केंद्राकडून आतापर्यंत २१,७६१ कोटींची रक्कम मिळालेली नाही. यावर अण्णामलाई म्हणाले की, जीएसटीच्या बाबतीत एमके स्टॅलिन यांनी हे समजून घेतले पाहिजे की कौन्सिलने सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतला होता.

तामिळनाडूने जो भरपाई पर्याय निवडला होता, त्या अंतर्गत जुलै २०२२ नंतर रक्कम मिळायला हवी. ते फालतूचा मुद्दा बनवत आहेत. आता जीएसटी संकलन वाढल्याने तामिळनाडूलाही अधिक फायदा होत आहे. त्यांना वस्तुस्थिती सोडून राजकारण करायचे आहे. तमिळला अधिकृत आणि न्यायालयाची भाषा करावी, अशीही मागणी सीएम स्टॅलिन यांनी मंचावर पंतप्रधान मोदींकडे केली होती. त्याला हिंदीइतकाच दर्जा मिळायला हवा.

त्यावर पंतप्रधान मोदींनी मंचावरूनच उत्तर देताना तामिळ ही शाश्वत आणि वैश्विक भाषा असल्याचे सांगितले. भारत सरकार तमिळ भाषा आणि संस्कृतीसाठी वचनबद्ध आहे. भारत सरकार यासाठी निधीही जारी करते. त्याचवेळी अन्नामलाई यांनीही प्रत्युत्तर दिले आणि म्हटले की, पीएम मोदींनी तमिळ भाषेवर प्रेम व्यक्त केले आहे. स्टॅलिनने आता कोणतेही उत्तर द्यावे असे मला वाटत नाही कारण त्यांचा फक्त क्षुद्र राजकारणावर विश्वास आहे.

महत्वाच्या बातम्या-
आरिफ मोहम्मद खान बनणार पीएम मोदींचे कलाम जाणून घ्या काय असू शकते भाजपची रणनीती
पंजाबमधील रॅलीपेक्षा पीएम मोदींच्या पुनरागमनाचा भाजपला अधिक फायदा होईल का? जाणून घ्या
परदेशी पाहुण्यांना नवी दिल्ली ऐवजी गुजरातला का बोलावलं जातंय? मोदींच्या मनात काय चाललंय?
घरात मोदींचा फोटो लावल्याने संतापला घरमालक, म्हणाला, फोटो काढून टाक नाहीतर..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now