Share

बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता अनेकांसाठी आहे देवता, गरीबीतून उभं केलंय करोडोंचं विश्व

मिथुन चक्रवर्ती यांचे जीवन त्या सर्व लोकांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना स्वतः जीवनात काहीतरी करण्याची जिद्द आहे. तुम्हाला माहिती नसेल पण मिथून यांनी यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. मिथुन हे नक्षलवादी चळवळीचे एक भाग होते असे आपण अनेकदा वाचले आहे.

जेव्हा ते घराबाहेर पडायचे तेव्हा पाण्याच्या टाक्या आणि उद्याने या ठिकाणी ते लपून बसायचे. पण एक दिवस असा आला की त्यांना सर्व काही मिळाले ज्याला ते कष्टाचे फळ आहे असं मानतात. पण मिथुन यांना आजही त्यांचे संघर्षाचे दिवस आठवतात. मिथुन चक्रवर्ती 72 वर्षांचे झाले असले तरी ते अजूनही चित्रपट आणि राजकारणात सक्रिय आहेत.

1976 साली ‘मृगया’ चित्रपटाने सुरुवात केलेल्या मिथुन यांना पहिल्याच चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर बॉलिवूडला त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी 80 च्या दशकात ‘डिस्को डान्सर’ आणि ‘डान्स-डान्स’ सारखे चित्रपट करून रुपेरी पडद्यावर दहशत निर्माण केली होती.

गणपती बोहरा दिग्दर्शित ‘मर्द’ या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. कोणत्याही गॉड फादरशिवाय बॉलिवूडमध्ये आपली मजबूत ओळख निर्माण करणाऱ्या मिथुन यांचे आजही लाखो चाहते आहेत. मिथुन यांनी अभिनयाव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात हात आजमावला आहे आणि भरपूर पैसा कमावला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथुन चक्रवर्ती सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. मुंबईशिवाय मिथुन यांचे उटी येथेही स्वतःचे घर आहे. लक्झरी वाहनांचे शौकीन असलेल्या मिथून यांच्याकडे मर्सिडीज बेंझ, फोर्ड इंडीविअर, टोयोटा फॉर्च्युनर यांसारखी अनेक वाहने आहेत. मिथुनने अभिनयातून पैसा कमावला आणि नंतर हॉटेल इंडस्ट्रीत हात आजमावला.

उटी, म्हैसूर यांसारख्या पर्यटनस्थळांवर त्यांची आलिशान हॉटेल्स आहेत. मिथुन या हॉटेल्समधूनही भरपूर कमाई करतात. याशिवाय चित्रपटांमधूनही ते कोट्यावधींची कमाई करतात. एकेकाळी हालाकीचे जीवन जगणारे मिथुन चक्रवर्ती कधीही गरिबांना मदत करण्यापासून मागे हटले नाहीत. मिथुन अनेकदा गरजूंना मदत करताना दिसले आहेत. शिवाय ते सध्या राजकारणातही सक्रीय आहेत.

महत्वाच्या बातम्या
अक्षय कुमारसोबत काम का करत नाही? शाहरूख म्हणाला, मी जेव्हा झोपायला जातो तेव्हा तो..
साऊथला मागे टाकण्यासाठी सज्ज आहेत बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार, येणार एकामागून एक १८ चित्रपट
…तर शिवसेना शाखांना टाळे लावायला सुद्धा कुणी शिल्लक राहणार नाही; महीला नेत्याने पक्षप्रमुखांना सुनावले

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now