इंडियन प्रीमियर लीगमधल्या खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारीपासून बेंगलोरमध्ये सुरू झाला आहे. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली आहे. मात्र असे असतानाही लिलावात एक चेहरा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तो चेहरा म्हणजे काव्या मारन हिचा. हैद्राबाद संघाची सीईओ काव्या मारन लिलावादरम्यान खेळाडूंवर बोली लावताना दिसू आली. (mistry girl kavya maran)
काव्या दिसायला खूप सुंदर असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष काव्याने वेधून घेतले होते. त्यामुळे अनेकांना ही काव्या आहे तरी कोण असा प्रश्न पडला आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. काव्या ही आयपीएलचा संघ सनरायझर्स हैद्राबादसोबत काम करते. या संघाची ती सीईओ आहे.
न्यूयॉर्क विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लिओनार्ड अँड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून काव्याने एमबीए केले आहे. तसेच काव्याला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. एमबीए पूर्ण केल्यानंतर, काव्या मारनने संघाची रणनीती विकसित करण्यासाठी सनरायझर्स हैदराबादसोबत काम करण्यास सुरुवात केली.
चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतलेली काव्या केवळ लिलावादरम्यानच नाही तर आयपीएल सामन्यांदरम्यानही स्टेडियममध्ये दिसते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काव्याने वडील कलानिधी मारन यांच्या व्यवसायात प्रवेश केला. कलानिधी मारन हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे टीव्ही नेटवर्क सन टीव्हीचे मालक आहेत. या नेटवर्कमध्ये ३२ चॅनेल आणि २४ एफएम रेडिओ स्टेशन आहेत.
कलानिधी मारन यांची पत्नी कावेरी मारन देखील सनरायझर्स हैदराबादशी संबंधित आहे. ती देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या व्यावसायिक महिलांपैकी एक आहे. वडील मालक असूनही काव्या थेट त्यांच्या व्यवसायात सामील झाली नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने सर्वप्रथम सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली, त्यानंतर तिने संघासाठी काम करण्यास सुरुवात केली.
६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या काव्याला फिरण्याचा आणि संगीत ऐकण्याचा विशेष छंद आहे. याशिवाय तिला मीडिया क्षेत्र आणि विमान वाहतूक क्षेत्रातही रस आहे. काव्याने सन टीव्ही नेटवर्कसोबत २०१९ मध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कलानिधी मारन यांनी त्यांच्या मुलीचा संचालक मंडळामध्ये समावेश केला होता. काव्या सन टीव्ही ग्रुपच्या डिजिटल मार्केटिंग टीममध्ये खूप सक्रिय आहे.
महत्वाच्या बातम्या-
PHOTO: ड्रग्स प्रकरणी जेलमधून सुटल्यानंतर पहिल्यांदाच IPL लिलावात दिसला आर्यन; सुहानाही होती सोबत
‘या’ 4 टिप्समुळे वाढेल स्मार्टफोनची बॅटरी लाइफ, हाय स्पीडने होईल चार्ज
पत्नी आणि मुलानेच केली वडिलांची हत्या; सातव्या मजल्यावरून दिले ढकलून, कारण वाचून धक्का बसेल