एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता लवकरच विस्तार होणार असून मुहूर्त ठरला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपुर्वी पहिला विस्तार होणार असून ती निवडणूक झाल्यानंतर दुसरा विस्तार होणार आहे.
काही जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. जी सगळी महत्वाची खाती आहेत ती भाजपकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, अशी महत्वाची खाती भाजपकडे जाणार आहेत. तर उरलेली नगरविकास, परिवहन, शिक्षण अशी खाती शिंदे गटाकडे जाणार आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीआधी काही मंत्र्याचे शपथविधी होणार आहेत तर निवडणुकीनंतर काही मंत्र्यांचे शपथविधी होणार आहेत. जरी दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असला तरी काही खाती लगेच भरली जाणार नाहीत. दोन ते तीन मंत्रिपदं रिक्त ठेवली जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहेत.
भाजप स्वताकडे २८ मंत्रीपदं तर शिंदे गटाला १५ मंत्रीपद देणार आहे. दोन टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार हा नाराजांना सांभाळून घेण्यासाठी ठेवण्यात आला आहे. नाराजांनी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून काही जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. आर्थिक तरतुद असणारी सर्व खाती भाजपकडे जाऊ शकतात.
त्यामध्ये गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास अशी मोठी खाती भाजप स्वताकडे ठेवणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व सामान्य प्रशासन खात असू शकतं. याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असू शकते. गृहखात्याबरोबरच अर्थखातेही फडणवीसांकडे जाणार असल्याच बोललं जातं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच बोललं जातं आहे. शिंदे गटातील नऊ माजी मंत्र्यांपैकी एक किंवा दोन जणांना पुन्हा संधी न देण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
‘विश्रांती घेतल्याने कोणीही फॉर्ममध्ये येत नाही’, दिग्गज क्रिकेटर विराट-रोहितवर संतापला
भाजप आमची शत्रू नाही पण वाचाळवीरांना माफी नाही, दीपाली सय्यद यांचा सोमय्यांवर निशाणा
‘या’ बड्या सरकारी बँकेने बदलले चेक क्लिअरन्सचे नियम, चेक इश्यू करण्याआधी जाणून घ्या
मातोश्रीवर जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी श्रीकांत शिंदे मैदानात, त्यांचे मन वळवून शिंदे गटात करणार सामील?