mim imtiaz jaleel shocking statement on aditya thackeray | राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असण्यावर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टाटांचा प्रकल्प गुजरातला गेल्यावर भाजप-शिंदे सरकारला सुनावले होते. पण त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
२१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळी मुख्यमंत्री यांचे वडील होते. जे बोलताय ते कॅबिनेट मंत्री होते. प्रकल्पात काही देवाणघेवाण झाली नाही म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला अशी शंका लोकांमध्ये आहे. छोटा पप्पू पहिले बोलले असते, तर आज ही वेळ आली नसती, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले होते.
आता अब्दुल सत्तार यांच्या या टीकेवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी अब्दुल सत्तार यांना चांगलाच टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे हे उच्चशिक्षित आणि हुशार नेते आहे, असे जलील यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे हे एक उच्चशिक्षित युवा नेतृत्व आहे. त्यांच्याबद्दल असे कुणीही बोलणे योग्य नाही. मी स्वत: आदित्य ठाकरेंना भेटलो आहे. त्यांचं अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अशा भाषेत त्यांच्याबद्दल बोललं नाही पाहिजे, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का असा प्रश्न केला होता? त्यावरही इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तारांचं हे वक्तव्य शोभणार नाही, त्यांचा २०-३० मिनिटांचा तो दौरा काही फायद्याचा नाही, असेही जलील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, टाटा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले आहे. ते म्हणाले की, राजकारण वेगळं आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री होता. तुमचे वडील मुख्यमंत्री होते, तेव्हा हा प्रकल्प गुजरातला गेला. हे सर्व पाप २०२१ मधील आहे.
महत्वाच्या बातम्या-
Saamana : भाजप आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार? सामनातून केलेल्या ‘या’ आवाहनानंतर चर्चांना उधान
zimbabwe : वर्षभरापूर्वी फाटके बुट घालून खेळला, आता पाकिस्तानविरुद्ध गाजवले मैदान; वाचा झिम्बाब्वेच्या ‘त्या’ खेळाडूबद्दल
shivsena : ठाकरे गटाचं टेंशन वाढलं, अंधेरी पोटनिवडणुक रद्द होण्याची शक्यता? जाणून घ्या काय आहे प्रकरण





