Share

आघाडीत पुन्हा बिघाडी! काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले…

महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांच्यात अंतर्गत वाद असल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. बऱ्याच नेत्यांनी आपली नाराजी प्रसार माध्यमांसमोरही मांडली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. (milind deo allegation on uddhav thackeray)

महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असले तरी महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहे, अशी चर्चा होती. असे असतानाच आता काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंचा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे.

मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभागरचनेच्या मुद्यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे. मिलिंद देवरा यांच्या या टीकेवरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. तसेच शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात आता दुरावा निर्माण झाल्याचेही म्हटले जात आहे.

मुंबई महापालिकेत ज्याप्रमाणे वॉर्डरचना करण्यात आली, ती पाहता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही वॉर्ड रचना लगेचच रद्द करण्यात यावी, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. मिलिंद देवरा यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुका मुक्तपणे आणि निष्पक्षपणे पार पडायला हव्यात केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी मुंबईच्या वॉर्डांमध्ये फेरबदल नको. ते अनैतिक आहे, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
गुरूपौर्णिमेनिमित्त प्राजक्ता माळीने उघड केले तिच्या गुरूंचे नाव, म्हणाली, त्यांनी माझ्या मनाला…
लायकीपेक्षा जास्त बोलू नका, इज्जत मिळतेय ती घ्यायला शिका; दीपक केसरकरांवर राणे भडकले
गुरूपौर्णिमेदिवशीच दिपाली सय्यद एकनाथ शिंदेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now