Share

‘आपल्या बापाला काहीही झालं तरी…; एसटी कर्मचाऱ्यांमध्ये चिथावणीखोर मेसेज व्हायरल

gunaratne

शुक्रवारी मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवारांच्या घरावर हल्ला प्रकरणी चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी सांगितले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राज्यभर चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्या घरी रात्री अचानक पोलिस दलातील ४-५ कर्मचाऱ्यांनी धाड टाकली.

शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. सदावर्ते यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर प्रतिक्रिया दिली. “माझी हत्या होऊ शकते”, असा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना केला. पुढे ते म्हणाले, मला नोटीस न देता अटक करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.

सदावर्ते यांच्या अटकेनंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली होती. हे सगळे शरद पवार यांचे कारस्थान आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. ”कर नाही त्याला डर कशाला!”मी कपडे बदलत असताना महिला पोलीस माझ्या बेडरूममध्ये घुसल्या, माझ्या कुटुंबाला धोका असल्याच त्या म्हणाल्या.

तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल होत आहेत. हे मेसेज सदावर्तेंना पाठिंबा देण्याचे आवाहन करत असून त्यामध्ये कोर्टासमोर हजर राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. ‘आपल्या बापाला काहीही होऊ देणार नाही,’ असे चिथावणीखोर मेसेज तुफान व्हायरल होतं आहेत.

दरम्यान, ‘गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा आहे. विरोधी पक्षाच्या दळभद्रीपणाचा कळस आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठी फंडिंग केलं जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
एसटी कर्मचारी आंदोलनात नव्हतेच; पोलिस तपासात खळबळजनक खुलासा, कोण होते ते भाडोत्री माणसं? वाचा सविस्तर
एकेकाळी सलमान खानची पत्नी बनून सगळ्यांना घायाळ करणारी ‘ही’ अभिनेत्री झाली आता गायब
हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता; राष्ट्रवादी आमदाराचं खळबळजनक विधान
सलमान खानने ‘या’ कारणामुळे ऐश्वर्याच्या मारली होती थोबाडीत, अनेक वर्षांनंतर सलमानने सोडले मौन

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now