eknath shinde : तब्बल 22 हजार कोटी गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरातला गेल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने शिंदे – फडणवीस सरकार तूफान टीका होत आहे. शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत.
त्यात आता आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. तब्बल 22 हजार कोटींचा हा एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे गुजरातमध्ये 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचे सांगितले होते. आता याच मुद्यावरून राजकारण तापलं आहे.
याचाच धागा पकडत ब्राह्मण महासंघाने देखील शिंदे – फडणवीस सरकारवर तूफान टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी थेट “महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा अशी जळजळीत टीका केली आहे. यामुळे आणखी नवीन वादाला तोंड फुटणार असल्याच बोलल जातं आहे.
पुढे बोलताना आनंद दवे यांनी म्हंटलं आहे की, एक नंबरवरील महाराष्ट्र 5व्या नंबरवर चालला आहे. मात्र सगळे राजकारण करण्यातच दंग आहेत. त्यामुळे बाकरवडी आणि ढोकळा एकत्र करा असही दवे म्हणाले आहेत, दवे यांच्या वक्तव्यावर अद्याप शिंदे – फडणवीस सरकारमधून प्रतिक्रिया आलेली नाहीये.
महत्वाच्या बातम्या
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर