ब्रिटनची गुप्तचर संस्था MI5 ने एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा ब्रिटनच्या एका खासदाराशी संबंधित आहे. पण यामुळे भारत सरकारचाही त्रास वाढू शकतो. MI5 या गुप्तचर संस्थेने ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार बॅरी गार्डिनर हे चिनी एजेंट असल्याचे सांगितले आहे. MI5 या खुलाशामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.
कारण भारत सरकारने बॅरी गार्डनर यांना जानेवारी २०२० मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. MI5 या ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बॅरी गार्डिनर यांनी ब्रिटनमधील लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहचवण्यासाठी चीनकडून पैसे घेतले. या कामासाठी चीनच्या क्रिस्टीन चिंग कुई ली या लॉ फर्ममार्फत गार्डिनरच्या कार्यालयात बराच काळ पैसे पाठवले जात होते.
क्रिस्टीनच्या फर्मची लंडन आणि बर्मिंगहॅममध्येही कार्यालये आहेत. त्यांची फर्म लंडनमधील चिनी दूतावासासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून देखील काम करते. एवढेच नाही, तर बॅरी गार्डनरने क्रिस्टीनचा मुलगा डॅनियल विल्कीस यालाही त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली होती. मात्र, MI5 या गुप्तचर संस्थेकडून खुलासा झाल्यानंतर डॅनियलने गुरुवारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.
MI5 च्या माहितीनुसार, क्रिस्टीन ही खरं तर चिनी गुप्तहेर आहे. ती ब्रिटनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट (UFWD) साठी काम करते. UFWD च्या आदेशानुसार, ती ब्रिटनमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि अस्थिरता निर्माण करण्याचे काम करते. चीनच्या हिताची धोरणे आणि निर्णय प्रभावित करण्याचा प्रयत्न ती ब्रिटनमध्ये करत आहे.
बॅरी गार्डिनर शिवाय इतरही व्यक्ती या प्रकरणात सामिल आहेत. क्रिस्टीनने तिच्या लॉ फर्मद्वारे इतर पक्षांना आणि त्यांच्या खासदारांनाही निधी उपलब्ध करून दिला आहे. या खुलाशासोबतच गुप्तचर संस्थेने सर्व पक्ष आणि खासदारांना चिनी हस्तक्षेपाविरोधात इशाराही दिला आहे, अशी माहिती ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने दिली आहे.
दुसरीकडे, बॅरी गार्डिनरने ब्रिटनच्या भारतीय दूतावासात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला आहे. ब्रिटनमधील भारतीय लोकांमध्ये ते फार लोकप्रिय आहेत. ब्रेंट नॉर्थच्या मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ब्रेंट नॉर्थ शहरात भारतीय वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. याच भारतीय वंशाच्या लोकांनी बॅरी गार्डिनर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्याची मागणी भारत सरकारकडे केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
चीनच्या गुप्तहेराला मोदी सरकारने दिला पद्मश्री; देशाला हादरवून टाकणारी माहिती आली समोर
भयानक प्रथा! नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाचे मांस खातात अन् राखेचे सूप बनवून पितात ‘हे’ लोक
महाराष्ट्र शासनाची भन्नाट योजना! ‘या’ व्यवसायासाठी मिळणार ५० लाखांपर्यंत अनुदान; ‘असा’ करा अर्ज