सध्या सर्वत्र आखाड पार्ट्या सुरू आहे. अवघे काही दिवस आता शिलक्क राहिले आहेत. सध्या मांसाहार खाणाऱ्यांची चांगलीच चंगळ सुरू आहे. घरोघरी सध्या मांसाहारवर दणका सुरू आहे. अशातच सध्या एका आखाड पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे.
विशेष बाब म्हणजे, ही आखाड पार्टी राज्यातील सर्वात मोठी असणार आहे. राज्यातील लोकप्रतिनिधीने एका दिवशी एका वेळी दहा ठिकाणी दिलेली ही पहिली मेगा आषाढ मेजवानी असणार आहे. सध्या राज्यात याच पार्टीची तूफान चर्चा सुरू आहे.
आमदार महेश लांडगे यांनी ही आज जंबो आखाड पार्टी मतदारसंघात दहा ठिकाणी रात्री आयोजित केली आहे. सर्वत्र सध्या याच पार्टीची चर्चा सुरू आहे. आयोजित केलेल्या आखाड पार्टीचे नियोजन त्या त्या भागातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे.
तुम्हाला वाचून धक्का बसेल मात्र या आखाड पार्टीत तब्बल सत्तर हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. लांडगे यांची टीम मेगा इव्हेंट कार्यक्रम करण्यात तज्ज्ञ आहे. या जंबो आखाड पार्टीमागे राजकीय गणित असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या आखाड पार्टीसाठी काही मंगल कार्यालये बुक करण्यात आली असल्याची देखील माहिती मिळत आहे. या जंबो आखाड पार्टीचा खर्च वाचून तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. मिळालेल्या माहितीनुसार. तीस लाख रुपये खर्च यावर होईल, असा अंदाज आहे.
वाचा आखाड पार्टीतील मेनू..!
मिळालेल्या माहितीनुसार, २१०० किलो मटन, तेवढेच चिकण, बाराशे ३० किलोचे मासे, १३ हजार अंड्यांची व्यवस्था या पार्टीसाठी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व चुलीवर तयार करणार आहे. यासोबतच जिलेबी आणि गुलाबजाम देखील असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: रात्री उशीरा बोल्ड कपडे घालून चाहत्यांशी व्हिडीओ कॉलवर बोलत होती अभिनेत्री, सगळेच घायाळ
शेजारच्या वहिनीसाठी पास्ता घेऊन जायचो आणि तिच्यासोबत.., प्रसिद्ध अभिनेत्याचा गौप्यस्फोट
शिंदेंना मुख्यमंत्री नको अन्यथा आत्महत्या करण्याची युवकाची धमकी; ४० फूट कमानीवर चढून घातला गोंधळ
Eknath shinde: शिंदेंचा दावा! आमच्या क्रांतीची दखल जगातील ३३ देशांनी घेतली, आज मी दिसलो तर लहान मुलेही म्हणतात…