Share

मोदींनी अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचा मेघडंबरीचा भाग तुटला, महापौरांनी दिले स्पष्टीकरण

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीचा भाग तुटला आहे. आता या प्रकरणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (mayor murlidhar mohol on chhatrapati shivaji maharaj statue

विद्युत रोषणाई वेळी मेघडंबरीला धक्का लागल्यामुळे हा अपघात झाला आहे. दोन दिवसांत मेघडंबरीचा तो भाग लावण्यात येईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. तसेच यामध्ये राष्ट्रवादीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप महापौरांनी केला आहे.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं. मात्र या पुतळ्यावरील मेघडंबरीचा भाग तुटल्याचं सोमवारी संध्याकाळी समोर आलं होतं.

सजावटीचा भाग काढताना मेघडंबरीला धक्का लागून ते तुटल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप काँग्रेस, मराठा सेवा संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला. यावेळी त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली होती.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांच्यात फेसबूक लाईव्हवरुन जुंपल्याचं पाहायला मिळालं.

महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरील मेघडंबरीचा भाग तुटताच जगताप यांनी फेसबूक लाईव्ह केले होते. त्या लाईव्हवर त्यांनी भाजपवर टीका केली होती. तसेच भाजप खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलं होतं.

महत्वाच्या बातम्या-
तुमच्याकडे कार असो वा बाईक, १ एप्रिलपासून या झटक्यासाठी राहा तयार, खिशावर येणार ताण
शाहरूखने मारला मोठा हात, पठाण चित्रपटासाठी दिपीका आणि शाहरूखने घेतली तब्बल ‘एवढी’ फी
Russia Ukraine war: मोदींचा तो फोटो पुन्हा होतोय व्हायरल, पुतिन यांच्यामागे हात बांधून उभे आहेत मोदी

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now