बॉलिवूमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गीतकार माया गोविंद यांचे निधन झाले आहे. त्या ८० वर्षांच्या होत्या. ‘कजरे की बाती’, ‘आँखों में बस हो तुम’, ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘तेरी मेरी प्रेम कहानी’ आणि ‘रानी चेहरे वाले’ यांसारखी अनेक सदाबहार गाणी त्यांनी लिहीली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. (maya govind pass away)
८० वर्षीय माया गोविंद यांनी आज राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला. माया गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत होते. गीतकार माया गोविंद यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर टीव्हीवरही शोककळा पसरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मेंदूतील रक्त गोठल्यामुळे त्यांना जानेवारीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांच्यावर काही दिवस उपचार सुरू होते आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु वयाच्या या टप्प्यात त्या आजारातून बऱ्या होऊ शकल्या नाही आणि त्यांची प्राणज्योत मावळली.
माया गोविंद यांचा मुलगा अजय गोविंद त्यांच्या तब्येतीची माहिती देत होता. काही काळापूर्वी एका वाहिनीशी बोलताना त्यांच्या मुलाने सांगितले की, त्यांच्या आईला आधी फुफ्फुसात संसर्ग झाला आणि नंतर मेंदूमध्ये रक्त गोठले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले.
चित्रपट उद्योगातील माया गोविंदा या एकमेव गीतकार होत्या ज्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी गाण्यांव्यतिरिक्त अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी निर्माता दिग्दर्शक आत्मा राम यांच्या ‘आरोप’ या चित्रपटातून गाणी लिहायला सुरुवात केली. १९७९ मध्ये आलेल्या ‘सावन को आने दो’ या चित्रपटातील ‘कजरे की बाती’ने माया गोविंद यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली.
त्यानंतर त्यांनी ‘आँखों में बस हो तुम’, ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘तेरी मेरी प्रेम कहानी’ आणि ‘रानी चेहरे वाले’ अशी अनेक सदाबहार गाणी लिहिली, जी आजही लोक ऐकली जातात. ‘किस्मत’ आणि ‘मायका’ या टीव्ही शोची टायटल साँगही त्यांनी लिहिली. याशिवाय ‘विष्णु पुराण’, ‘किस्मत’, ‘द्रौपदी’, ‘आप बीती’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी आपले लेखन कौशल्य दाखवले.
महत्वाच्या बातम्या-
तुम्ही तिकीटे काढा मी काहीतरी खायला आणते म्हणली आणि.., पत्नीने नवऱ्याला दिला गुलीगत धोका
VIDEO: लोकांना एप्रिल फुल करणं पडलं महागात; अंशुमनची पत्नी विनंती करत म्हणाली, ‘हे सगळं थांबवा’
‘मुलगी झाली हो’ मालिका खरंच बंद होणार? स्टार प्रवाह वाहिनीने दिले स्पष्टीकरण