इत्तेहाद-ए-मिल्लत काऊंसिलचे (IMC) अध्यक्ष आणि अला हजरत दर्गाशी संबंध असलेले मौलाना तौकीर रझा खान यांनी एक वादग्रस्त विधान केले आणि सरकारकडून करण्यात येत असलेल्या बुलडोझरची कारवाई एकतर्फी असल्याचे सांगितले आहे. बुलडोझरच्या बहाण्याने मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे.
जर ही एकतर्फी कारवाई थांबवली नाही, तर मुस्लिमांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आणि ज्या दिवशी मुस्लिम रस्त्यावर येतील, तो दिवस तुम्हाला सांभाळता येणार नाही. मौलाना तौकीर यांनी गुरुवारी दर्गाह आला हजरत येथील त्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुस्लिमांवर एकतर्फी कारवाई केली जात असून सरकार आमचे ऐकत नसल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, आरोपी असणे आणि गुन्हेगार असणे यात फरक आहे. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणीही दोषी नसून आरोपी आहे. आरोपींच्या घरावर आणि दुकानांवरही बुलडोझर चालवला जात आहे. ही कसली कृती आहे?
मौलाना तौकीर रझा खान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकतर्फी कारवाईवरही मौन बाळगून आहेत. मोदी हे महाभारतातील धृतराष्ट्र वाटतात. हा माझा मोदी सरकारला इशारा आहे की जर वृत्ती बदलली नाही तर महाभारत पुन्हा घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एकतर्फी कारवाई न थांबविल्यास ईदनंतर दिल्लीत रणनीती बनवून देशव्यापी जेल भरो आंदोलनाची घोषणा केली जाईल, असे मौलाना तौकीर रजा खान यांनी सांगितले.
यामध्ये मुस्लिम आणि बंधुभावाचे समर्थक, सर्व धर्माचे लोकही सहभागी होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मौलाना तौकीर रझा खान यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, सीबीआय, ईडीच्या भीतीने अखिलेश यादव मुस्लिमांवरील अत्याचारावर गप्प बसले आहेत. यूपीमध्ये त्यांचे सर्व आमदार मुस्लिमांच्या मतांनी विजयी झाले आहेत, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे, असेही ते म्हणाले.
मौलाना यांनी मुस्लिमांना सपाचा पाठिंबा सोडण्याचे आवाहन करत सपाच्या आमदारांनी राजीनामा देऊन मुस्लिमांवरील अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरावे, असे सांगितले. अशा वेळी मुस्लिमांनी संयम बाळगावा, असेही मौलाना म्हणाले. कोणाच्याही भानगडीत पडू नका आणि मशिदी आणि दर्ग्यांच्या बाहेर सीसीटीव्ही लावा, जेणेकरून गैरप्रकार समोर येतील, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
तोंडाला लकवा झाल्यासारखं वाकडं तोंड करून हिंदू परंपरांचा अपमान करायचा उद्योग थांबव, नाहीतर..
आम्ही त्यांना देण्यासाठी १०१ रूपये दक्षिणा आणि केळी आणली होती, पण…
आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं कुठं घुसू एवढं लक्षात ठेवा, रुपाली पाटलांचा ब्राम्हण महासंघाला इशारा
बॅंकेत कॅशिअर म्हणून काम करायचे ACP प्रद्युम्न, रामायणातील ‘या’ एका पात्राने बदलले नशिब, वाचा यशोगाथा