Share

इतर लोकांना जर मशिदींवरील भोंग्यांचा त्रास होत असेल, तर…; मौलाना रशीद अब्दुल यांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यावरुन राज ठाकरेंवर राजकीय नेत्यांनी टीका केल्या होत्या. (maulana abdul rasheed on loud speaker)

आता त्या सभेनंतर राज ठाकरेंनी टीकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात मंगळवारी उत्तर सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारमधील नेत्यांवर टीकाही केल्या. तसेच भोंगे खाली उतरवण्याबाबतच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

त्यानंतर आता राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मौलाना अब्दुल रशीद यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. इतरांना भोंग्याचा त्रास होत असेल, तर मुस्लिमांनी भोंग्याच्या आवाजाची मर्यादा पाळावी, असे अब्दुल रशीद यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी असे म्हटले आहे.

नमाजची वेळ ही ठरलेली असते. लोकांना नमाज सुरु झालेली आहे, हे सांगण्यासाठी हे लाऊडस्पीकर लावले जातात. पण लाऊडस्पीकरचा आवाज जास्त ठेवणे योग्य नाहीये. मी असं नाही म्हणणार की लाऊडस्पीकर नका लावू, लाऊडस्पीकर लावा पण त्याचा आवाज कमी ठेवावा, असे अब्दुल रशीद यांनी म्हटले आहे.

या देशात खुप सारे जाती धर्म आहेत, त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी की आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. आपल्या आवाजामुळे कोणाला त्रास होत असेल, तर मशिदींवर लावल्या जाणाऱ्या भोंग्याचा आवाज कमी केला गेला पाहिजे, असेही अब्दुल रशीद यांनी म्हटले आहे.

आमचा इस्लाम धर्म हेच सांगतो की कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळे जर कोणाला आपल्या लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे त्रास होत असेल, तर तो आवाज नक्कीच कमी केला पाहिजे. या देशात वेगवेगळे जाती-धर्म आहे. या सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आपण आपल्यातच लढाई नाही केली पाहिजे, असेही अब्दुल रशीद यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
“राजसाहेबांचं भाषण म्हणजे…”, अभिनेते शरद पोंक्षेंची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ
‘ ‘या’ तिघांचा गेम शरद पवारांनीच केला’; राज ठाकरे यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
गुणरत्न सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासा, मी त्याला ५० हजार बक्षीस देईल; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now