Share

आधी म्हणाले छेडोंगे तो छोडेंगे नहीं, आता म्हणताय…; मशिदींवरील भोंग्याबाबत मुस्लिम संघटनेने बदलला सुर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी उत्तर सभा घेतली होती. त्यावेळीही भोंग्याबाबत आपली भूमिका तीच असल्याचे स्पष्ट केले होते. (matin shekhani shocking statement on loud speakers)

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेला काही संघटनांनी समर्थन दिले आहे. तर काही लोकांनी त्यांचा विरोध केला आहे. त्यानंतर पीएफआयचे मतीन शेखानी यांनी प्रतिक्रिया यावर दिली होती.

मुस्लिमांवर अत्याचार होत असून लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण छेडोंगे ते छोडेंगे नहीं. तसेच लाऊडस्पीरकरला हात लावला तर पीएफआयचे कार्यकर्ते सर्वात पुढे दिसतील, असे मतीन शेखानी यांनी म्हटले होते. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या, असे असताना आता त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र सरकार भोंग्यांबाबत योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे आणि सरकार जो काही निर्णय घेईल त्याचे आम्ही स्वागत करु. तसेच मी एक राजकीय नेता नाही, एक सामाजिक कार्यकर्ता आहे, असे मतीन शेखानी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार लाऊडस्पीकरबाबत कोणता निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

लाऊडस्पीकर फक्त मशिदींवर नाही, तर मंदिर, गुरुद्वारा, चर्च अशा प्रत्येक धार्मिक स्थळांवर आहेत. त्यामुळे आवाज किती डेसिबल असावा यावर विचारविनिमय करुन मार्ग काढता येऊ शकतो. तसेच सुप्रीम कोर्टाचे निर्देश डेसिबलबाबत आहेत. भोंगे काढण्याबाबत नाहीत, असेही मतीन शेखानी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लाऊडस्पीकर प्रकरणी मुंब्रा येथे प्रभोक्षक भाषण केल्याप्रकरणी मतीन शेखानीसह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सर्वांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातही पोलिसांच्या परवानगीशिवाय सभा घेतल्याने मतीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या सलग सहाव्या पराभवानंतर निराश झाला रोहित; म्हणाला, काय चूक होतेय माहिती नाही, पण…
झोपेच्या गोळ्या देऊन उपचारासाठी आलेल्या मुलीवर डॉक्टर करायचा बलात्कार, २३ वर्षांनी असा झाला खुलासा
रणबीर कपूरला लग्नात सासूकडून मिळाले तब्बल एवढ्या कोटींचे गिफ्ट, किंमत वाचून डोळे होतील पांढरे

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now