Share

ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरेतील ईदगाह मशिदीचीही होणार तपासणी? कोर्टाने दिला मोठा निर्णय

वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणानंतर आता मथुराची श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वाद आणखी जोर पकडताना दिसत आहे. काशी विश्वनाथ ज्ञानवापी मशीद वादात सर्वेक्षणाच्या तयारीसोबतच मथुरा ईदगाहच्या सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिकाही न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (mathura court dission on mathura mosques survey)

अलाहाबाद उच्च न्यायालयात फिर्यादी मनीष यादव यांनी शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी न्यायालयीन आयुक्तांमार्फत केली आहे. त्याचवेळी मथुरा कोर्टाने ही याचिका स्वीकारली असून, आता या प्रकरणावर १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्ते मनीष यादव, महेंद्र प्रताप सिंग आणि दिनेश शर्मा यांनी स्वतंत्रपणे अशीच याचिका दाखल करून कोर्ट कमिशनरची नियुक्ती करून इदगाह मशिदीचे व्हिडिओग्राफी करण्याची मागणी केली होती. ही याचिका न्यायालयाने स्वीकारली असून सर्व याचिकाकर्त्यांना १ जुलै ही तारीख दिली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने गौण न्यायालयाला मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी वादाशी संबंधित मूळ प्रकरणात याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या दोन अर्जांवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. आता न्यायालयाने मथुरा न्यायालयाला चार महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

मथुरेच्या जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची यादी करून त्यांची एकत्रित सुनावणी करण्याची मागणी एका अर्जात करण्यात आली आहे. दुसऱ्यामध्ये वादग्रस्त जागेवर मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनीष यादव यांचे वकील देवकीनंदन शर्मा म्हणतात की, ईदगाहमधील शिलालेख इतर लोक काढून टाकू शकतात आणि पुरावे नष्ट करू शकतात. त्यामुळे तेथे दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत मशिदीतील सर्वेक्षण करून सर्व वस्तुस्थिती जाणून घ्यायला पाहिजे.

शाही इदगाह मशिदीचे वकील तनवीर अहमद म्हणतात, ‘गेल्या दोन वर्षांपासून फिर्यादी वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज देत आहेत, त्यांना स्वतःला माहिती नाही. शेवटी त्यांना काय म्हणायचे आहे, मथुरेत दोघांची देवस्थाने वेगळी आहेत, व्हिडिओग्राफीची गरज नाही. दरम्यान, इदगाह मशिदीसंदर्भात मथुरा कोर्टात आतापर्यंत १० खटले दाखल करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
पायलट अचानक पडला आजारी, प्रवाशी बसला पायलट सीटवर पण त्यालाही विमान उडवता येत नव्हते…
लायगरच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज, विजय देवरकोंडाची शैली पाहून चाहते झाले उत्सुक
संभाजीराजांना ठार मारणाऱ्या, मंदीरे पाडणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now