मोठी बातमी! ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र झाला मास्कमुक्त, जाणून घ्या कोणकोणते निर्बंध हटवले

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात लागू करण्यात आलेले कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. आज मंत्रिमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. १ एप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचे कोणतेही नियम नसतील. (mask free maharashtra)

आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले … गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच आता महाराष्ट्रात मास्क ऐच्छिक असणार आहे.

राज्यातील बहुतांश लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. जलद लसीकरणामुळे कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोनाचे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मास्क न वापरल्यास होणारा दंडही आता रद्द करण्यात येणार आहे.

कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहे. आता महाराष्ट्रात कोणतेही निर्बंध असणार नाही. पण तरीही प्रत्येकाला काळजी आणि खबरदारी घ्यावी लागणारच आहेत. कुणीही बेजबाबदारपणे वागू नये. काळजी घेत राहावी. तसेच आपण मास्क ऐच्छिक ठेवला आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

हे निर्बंध नसणार-
• महाराष्ट्रातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे
• आगामी सणांवर कोणतेही निर्बंध नसणार
• रेल्वे प्रवासासाठी लसीकरणाची सक्ती नाही
• सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही निमय नसणार
• राज्यात मास्कचा वापक ऐच्छिक असेल
• हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृहात कोणतीही मर्यादा नसेल
• लग्न, कौटूंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रेमधील उपस्थितीवर निर्बंध नाही

महत्वाच्या बातम्या-
जॉन अब्राहम साऊथ इंडस्ट्रीवर भडकला, म्हणाला, मी हिंदी चित्रपटाचा हिरो आहे आणि..
नराधमांनी मुक्या जीवालाही सोडलं नाही; गरोदर बकरीवर केला सामूहिक बलात्कार, अशी झाली पोलखोल
रवी शास्त्रींनी भारतासाठी शोधला नवीन वेगवान गोलंदाज, म्हणाले, ‘हा फलंदाजांसाठी ठरेल डोकेदुखी’