Share

Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या

Maruti suzuki | भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीसाठी सणासुदीचा हंगाम चांगला गेला आहे. कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण विक्रीत 19 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने 167,520 मोटारींची विक्री केली आहे.

तर ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीने 138,335 युनिट्सची विक्री केली. यामध्ये निर्यात आणि व्यावसायिक वाहन विक्रीचाही समावेश आहे. मारुतीने देशांतर्गत बाजारात एकूण 140,337 प्रवासी वाहने विकली, जी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विकल्या गेलेल्या 108,991 युनिट्सपेक्षा 28.76 टक्के जास्त आहे.

कंपनीने प्रवासी कारच्या 100,505 युनिट्सची विक्री केली आहे ज्यात अल्टो, एस-प्रेसो सारख्या मिनी मॉडेल्स, बॅलेनो, सेलेरियो, डिझायर, स्विफ्ट आणि वॅगनआर सारख्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स आणि सियाझ मध्यम आकाराच्या सेडानचा समावेश आहे.

यादरम्यान Vitara Brezza, Ertiga, XL6, नवीन Grand Vitara आणि Eco Van सारख्या मॉडेल्सची विक्री 39,832 युनिट्सवर आहे. मारुती सुझुकीने नुकताच आपला तिमाही अहवाल जाहीर केला. विक्रमी विक्री दरम्यान, मारुती सुझुकीने नफ्यात 4 पट वाढ नोंदवली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) चा निव्वळ नफा वाढून 2,112.5 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या या यशामागे सर्वात मोठा हात आहे मारुती ग्रँड विटारा आणि मारुती ब्रेझा 2022 या गाड्यांचा आहे. कंपनीने आपली मारुती ब्रेझा या वर्षी नवीन अवतारात लॉन्च केली आहे. यानंतर मारुतीने आपली पहिली मध्यम आकाराची SUV Grand Vitara लाँच केली.

मारुती सुझुकीने अलीकडेच 9925 कार मोठ्या दोषांमुळे परत मागवल्या आहेत. कंपनीच्या वतीने मारुतीच्या तीन मॉडेल्सच्या कारमध्ये दोष आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये मारुती वॅगन आर, मारुती सेलेरियो आणि मारुती इग्निस यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या
BCCI च्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झाली २२ वर्षाच्या स्टार खेळाडूची कारकिर्द, संघातून झाली हकालपट्टी
Bablu Prithviraj: ५७ वर्षीय प्रसिद्ध अभिनेता पडला २४ वर्षीय मुलीच्या प्रेमात, म्हणाला, मी जर लग्न केलं तर…
Samantha Ruth Prabhu : प्रिय सॅम.., सामंथाच्या आजारपणाबाबत कळताच नागाचैतन्यच्या कुटुंबातून आली पहिली प्रितिक्रिया
eknath shinde : सत्तासंघर्षावर ठाकरे गटाने केली मोठी मागणी; एकनाथ शिंदेंसमोरील पेच वाढणार?

ताज्या बातम्या आर्थिक

Join WhatsApp

Join Now