मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता या नववर्षात देखील अनेक जोडपे विवाहबंधनात अडकण्यास तयार आहेत. हिंदीसोबत मराठीतीलही अनेक कलाकार यावर्षी नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास उत्सुक आहेत. यादरम्यान आता मराठीतील एका प्रसिद्ध गायिकेच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ही गायिका म्हणजेच अबोली गिऱ्हे.
अबोली गिऱ्हे ही मराठी कलाविश्वातील नवोदित गायिका आहे. मात्र, अल्पावधीतच तिने संगीतक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. अबोलीने ‘फुलपाखरू’, ‘काहे दिया परदेस’ यासारख्या प्रसिद्ध मालिकांचे शीर्षक गीत गायले आहे. तसेच ‘स्वामी समर्थ स्तुती’, ‘रंगलया’ आणि ‘येशील तू’ अशी गाणीसुद्धा तिने गायली आहेत. नुकतीच तिने ‘पांडू’ या चित्रपटासाठी पार्श्वगायनदेखील केलं आहे.
याशिवाय अबोलीच्या युट्यूब चॅनेलवर अबोलीने ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझा होशील ना’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकांचे शीर्षकगीत गातानाचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील.
अबोलीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अबोली तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाजात दिसून येत आहे. अबोलीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आदित्य कुरतडकर असे आहे. आदित्य हा म्युझिशियन असून तो एक उत्तम तबला वादक आहे.
आदित्य आणि अबोली यांचा जुलैमध्ये साखरपुडा समारंभ पार पडला. यादरम्यानचे अनेक फोटो अबोली आणि आदित्यने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले होते. तर आता लवकरच ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
कतरिनाने विकीच्या नावाच्या मंगळसूत्राचा फोटो केला शेअर, लोकं म्हणाली हिंदू धर्म मनापासून स्विकारलास
सख्ख्या भावाशी नाव जोडताच रवीना टंडनची उडाली होती झोप; म्हणाली कुटुंबाची राखरांगोळी…
अजूनही वेळ गेलेली नाही, चला एक होऊया जितेंद्र आव्हाडांचे ओबीसी नेत्यांना आवाहन