Share

१७४२ मध्येच मराठ्यांनी ज्ञानवापी मशिद पाडून तिथे मंदीर उभारले असते, पण ब्राम्हणांनी घोळ घातला..

सध्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु आहे. हिंदू पक्षकारांनी दावा केला आहे की ज्ञानवापी मशिद आधी मंदिर होते. ते तोडून मशिद तयार करण्यात आली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. (maratha want gyanvapi temple)

जर मंदिर असल्याचे सिद्ध झाले, तर मुस्लिम बांधवांनी ती जमीन परत करावी. तसेच हा दावा खोटा असल्यास हिंदू पक्षाने शांततापूर्ण मार्गाने ही जमीन मुस्लिम समाजाला मशिदीसाठी द्यावी असे न्यायालयाने म्हटले आहे. अशात ज्ञानवापी मशिदीबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे.

आता ज्ञानवापी मशिदीचं मराठा कनेक्शन समोर आलं आहे. ही घटना मल्हारराव होळकर यांच्या संबंधीची असून १७४२ मध्ये ही घडली होती. २७ जून १७४२ रोजी मराठे ज्ञानीवापी मशिदीजवळ गेले होते. त्यावेळी काशीतल्या पुरोहितांनी जर त्यांना रोखलं नसतं, तर हा मशिदीचा मुद्दा उभाच राहिला नसता, असे म्हटले जात आहे.

मराठा सरदार मल्हारराव होळकर २० हजार सैनिकांची फौज घेऊन काशीत पोहचले होते. औरंगजेबाच्या सैन्याने केलेल्या कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ते तिथे गेले होते. जिथे मंदिर पाडून मशिदी उभी केली गेली होती ती मशिद पाडण्याचा पुढाकार मल्हारराव होळकरांनी घेतला होता.

मंदिरं पाडण्याची मालिका थांबावी आणि मुघलांना जशाच तसं उत्तर द्यावं, हा त्यामागचा हेतू होता. मात्र त्यावेळी काशीतल्या काही पुरोहितांनी मल्हारराव होळकर यांना थांबवले. त्यामुळे मल्हारराव होळकरांचा नाईलाज झाला आणि होळकरांना यातून बाजूला व्हावं लागलं.

पुरोहितांना मुघलांच्या आक्रमनाची भिती होती, त्यामुळे पुरोहितांनी याबाबत मल्हारराव होळकरांना थांबवलं होतं. कारण दिल्लीत आणि दख्खन म्हणजेच आताच्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मराठ्यांनी मुघलांना सळो की पळो करुन सोडलं होतं. पण त्या काळात उत्तर भारतात मुघली आक्रमनाची भिती कायम होती. मराठे मंदिर उभे करुन परत जातील पण मुघल काशीवर आक्रमन करतील अशी भिती त्यांना होती. त्यामुळे मल्हारराव होळकरांना त्यांनी थांबवलं होतं.

महत्वाच्या बातम्या-
नवरात्रीदरम्यान मटणाची दुकानं बंद…’; सोनू निगमने केले आणखी एक वादग्रस्त विधान
दलित नवरदेवाच्या मिरवणूकीवर दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर चालवला बुलडोझर; ४८ घरे तोडली
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित! दौऱ्याला कडाडून विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह स्पष्टच बोलले, म्हणाले…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now