Share

तारीख, वार अन् वेळ सांगा, जशास तसे उत्तर देऊ; तानाजी सांवतांसाठी मराठा क्रांती मोर्चा रणांगणात

tanaji sawant

सकाळी संतापलेल्या शिवसैनिकांनी बंडखोर तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. संतापलेल्या शिवसैनिकांकडून पुण्यातील बालाजीनगर परिसरातील सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. गद्दार असे कार्यालयाच्या काचांवर लिहून या काचा फोडण्यात आल्या आहेत.

शिवसैनिकांनी सावंत विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी म्हंटलं होतं की, ‘जो शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला असेच उत्तर मिळणार. बंड करणाऱ्यांना अजूनही वेळ आहे. त्यांनी परत यावे, अन्यथा त्या सर्वांची अशीच अवस्था होईल.’

तर आता मराठा क्रांती ठोक मोर्चाने शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना पाठिंबा दर्शवला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या तोडफोड केलेल्या कार्यालयात जावून त्या ठिकाणी फुले वाहिली आहेत. तोडफोड केलेल्या कार्यालयात फुले वाहून मराठा क्रांती ठोक मोर्चाने सावंत यांना पाठिंबा दर्शवला.

याबद्दल माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक महेश डोंगरे यांनी सांगितलं आहे की, “सावंत यांच्या साखर कारखान्याच्या ऑफिसवर आज जो भ्याड हल्ला झाला. त्या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो.’ याबद्दल महेश डोंगरे हे मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

पुढे बोलताना महेश डोंगरे यांनी म्हंटलं आहे की, कार्यालयावर हल्ला होऊन देखील तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना शांततेत राहण्याच आवाहन केले आहे. पण येणार्‍या काळात तुम्ही तारीख, वार आणि वेळ सांगा, आम्ही देखील जशाच तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत.”

दरम्यान, हे सगळं झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला आहे. त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, आमचे गटेनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत.

एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं, असं ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर शिवसैनिक आणखी संतापले आहेत. सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या
आपल्या समर्थकांचा दादा भुसेंनी उघडला व्हॉट्सग्रुप, समर्थकांनी त्यांनाच घातल्या शिव्या
जेव्हा अक्षय कुमारने ‘या’ अभिनेत्याला सगळ्यांसमोर फटकारलं, म्हणाला; ‘गप्प राहा, खुप बकवास करतोस’
“मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच, मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही”

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now