असे म्हणतात की आपल्या मेलेल्या पत्नीची म्हणजे मुमताजची भव्य कबर बांधून तिची आठवण म्हणून त्याभोवती ‘ताजमहाल’ शहाजहानने बांधला आणि पुन्हा अशा प्रकारची कलाकृती किंवा इमारत कोणी बंधू नये म्हणून कारागिराचे हात तोडले होते.
पण ताजमहाल बांधल्यानंतर आग्र्यामध्ये ताजमहाल आहे हे जास्त कोणाला माहीत नव्हते. फक्त भारतीय लोकांना किंवा आग्र्यातील लोकांनाच त्या काळी ताजमहल आहे हे माहीत होते. पण मग ताजमहाल आहे हे पूर्ण जगाला कसे कळाले ? यामागे एक भलीमोठी कथा आहे.
इसवीसन १७०० च्या काळात मराठ्यांचा काय दबदबा होता हे या घटनेच्या आधारे तुम्हाला समजेल. काही जणांना हे कदाचित पटणार नाही पण या घटनेचे पुरावे फ्रेंच पत्रव्यवहारांमधील भेटतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले व्यवस्थापनाचा बारकाईने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की, त्यांनी स्वराज्याच्या स्थापना केल्यानंतर गड राखण्यासाठी जी व्यवस्था स्थापन केली त्यानंतर अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला होता.
ताजमहाल आज जगातील ७ आश्चऱ्यांपैकी एक आहे. पण ताजमहाल सुरक्षित आहे याचे सर्व श्रेय महादजी शिंदे आणि त्यांचे सेनापती डी बॉईन यांना जाते. डी बॉईन यांच्यामुळे ताजमहालची माहिती सर्व जगाला कळाली. डी बॉईन यांनी ही इमारत १९९४ मध्ये सुरक्षित ठेवली होती.
महादजी शिंदे यांनी आपल्या सैन्याचे घोडे ताजमहालमध्ये बांधले होते. याचा उल्लेख अनेक फ्रेंच समकालीन पत्रव्यवहारात आपल्याला आढळतो. जर मराठ्यांच्या सैन्याचा विचार केला तर सैन्यातले सगळे जण हे शेतकरी कुटुंबातील असायचे.
पण इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांची पूर्णवेळ सैनिकी तुकडी होती. आपली पण सैनिकी तुकडी असावी असं सदाशिव भाऊ पेशवे आणि महादजी शिंदे यांना वाटत होते. अगदी असाच विचार टिपू सुलतान आणि निजाम करत होते.
महादजी शिंदे यांनी या तुकडीसाठी प्रयत्न सुरू केले. १७८४ मध्ये डी बॉईन हा फ्रेंच सेनापती फ्रांस आणि रशियामध्ये कामगिरी पार पाडून महादजी शिंदे यांच्या मराठा सैन्यात आला. त्याने केवळ पाच महिन्यात ८५० कवायती सैन्याचे पथक तयार केले.
१७८५ मध्ये बुंदेलखंडमध्ये विजय मिळवून कामगिरी बजावली. १७८७ मध्ये राजपूत विरुद्धच्या लढाईत महादजी शिंदे यांचा पराभव होत होता तेव्हा या सेनापतीने त्यांना मदत करून विजय मिळवून दिला. १७८९ मध्ये बॉईनने महादजी शिंदे यांना कवायती तुकड्या वाढवण्यास सांगितले.
महादजी शिंदे यांनी त्याला नकार दिला. त्यांनी नकार दिला म्हणून बॉईनने महादजी शिंदे यांची नोकरी सोडली. परंतु महादजी शिंदे यांना ते परवडले नाही. सैन्याची गरज आणि साम्राज्याचा विस्तारासाठी त्यांनी पुन्हा बॉईन याला परत बोलावले.
डी बॉईन याने ८५० सैनिकांच्या पुन्हा ९ तुकड्या तयार केल्या. एकदा मिर्झा इस्माईल बरोबर महादजी शिंदे यांची आग्र्याजवळ लढाई झाली. त्यावेळेस घोड्यांना पावसापासून आणि नदीच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पाहिजे होते.
ताजमहाल हे सुरक्षित ठिकाण आहे असे महादजी शिंदे यांना वाटले. ताजमहाल शेजारी अनेक छोटी आसऱ्याची ठिकाणे आहेत. डी बॉईन याचा स्थापत्यकलेवर आणि स्थापत्यशास्त्र दोन्हींवर खूप प्रेम होते. त्याला ताजमहाल खूप आवडले. इमारत पाहून तो मंत्रमुग्ध झाला. पण त्याला महादजी शिंदे यांची कल्पना आवडली नाही.
परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे जी वास्तू किंवा इमारत रयतेच्या उपयोगासाठी येणार नाही ती इमारत म्हणजे पैसे आणि वेळ दोन्ही गोष्टींचा अपव्यय आहे. डी बॉईन यांच्या लक्षात ही गोष्ट आली.
फौजेच्या कवायतीसाठी महादजी शिंदे यांनी काही भाग डी बॉईनला दिला. त्यात आग्रा पण होते. त्यानंतर डी बॉईनमुळे जगाला ताजमहालचे महत्व कळले. आज ताजमहल सुरक्षित आहे त्याला कळत न कळत डी बॉईन आणि महादजी शिंदे यांचा खूप मोठा हात आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मला माझ्या गुरूंचा फोन आला, ‘पुन्हा पक्षात ये,’ मनसेत होणार बड्या नेत्याची घरवापसी
“भारतात परिस्थिती ठीक नाही, भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न,” राहुल गांधींची घणाघाती टिका
लाल महालातील लावणीचा वाद! अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक; गौमूत्राने केले शुद्धीकरण
नवाब मलिकांचे दाऊद गॅंगशी संबंध, त्यांनी दाऊद टोळीची मदत घेतल्याचे पुरावे; कोर्टाने स्पष्टच सांगितले