जेम्स लेन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जेम्स लेन प्रकरणात शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोटे आरोप केले आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. (manase angry on sharad pawar because of lane james case)
मुंबईत शरद पवारांनी सांगितले होते, की याप्रकरणी बोलताना शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी मौन बाळगले होते. मात्र आता पुरंदरे यांच्यासह इतिहास तज्ज्ञांनी याप्रकरणी ऑक्सफर्ड प्रेसला ते वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची मागणी करत एक निषेध पत्र सादर करुन मनसेने पवारांवर निशाणा साधला आहे.
शरद पवारांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेले आरोप खोटे आहे, असा दावा मनसेच्या वतीने केला आहे. त्याआधी शरद पवारांनी याप्रकरणी बोलताना असे म्हटले होते की, जेम्स लेननं छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेलं आक्षेपार्ह लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेच्याच माहितीवर आधारित होते. त्याची माहिती पुरंदरेंकडूनच घेतली होती, असेही लेननं म्हटलं होतं.
तसेच जेम्स लेननं उघडपणे सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली. तसेच त्याचं मला दु:ख नाही तर अभिमान वाटतो. त्यामुळे यावर कोणी काय म्हटलं असेल तर मला त्याबद्दल काही सुचवायचे नाही, असे शरद पवारांनी म्हटले होते. त्यानंतर आता मनसेनेही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसेने पुरंदरेंचे ते पत्र समोर आणले आहे.
जेम्स लेनप्रकरणावर शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी उघडपणे विरोधकाची भूमिका घेतली होती. त्याबाबत १०.११.२००३ रोजी हे पुस्तक मागे घेण्याची मागणी करणारे आणि एक निषेध करणारे पत्र थेट ऑस्करला लिहिले होते. त्या पत्रावर स्वत: बाबासाहेब पुरंदरे यांची सही आहे, असे मनसेचे म्हटले आहे.
तसेच खासदार प्रदीप रावत, जेष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार, निनाद बेडेकर, सदाशिव शिवदे, वसंत मोरे आदि मान्यवरांच्या सह्या आहेत. यापत्रामध्ये सर्वजण जेम्स लेनचे पुस्तक मागे घेण्यात यावे, अशी मागणी करत आहे. तसेच ते मागे न घेतल्यास भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणीही ते करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूवर फोडले रोहित शर्माने सलग पाचव्या पराभवाचे खापर, निराश होत म्हणाला…
30 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत पवारांनी 22 मिनिटांत राज ठाकरेंचा विषय केला क्लोज; असा केला पलटवार
सिमेंट उद्योगाला मोठा धक्का, कंपन्या चालल्या भारत सोडून; ACC, अंबूजासारख्या कंपन्या विक्रीला