Share

राष्ट्रवादीने केला उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम! शिवसेनेचा मोठा नेता फोडत पाडले खिंडार

ajit pawar uddhav thackeray

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. यादरम्यान ठाकरे गटाला मोठी गळती लागली. शिवसेनेच्या ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केले. उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या विकासासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे, इतर पक्षातील काही लोक ठाकरे गटात सामील होत आहेत. यामुळे काही जुने कामगार नाराज होणे स्वाभाविक आहे. असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडत आहे. जळगावात राष्ट्रवादीने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

ठाकरे गटाला राष्ट्रवादीने चिरडले आहे. मुंबई येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक डॉ.मनोहर पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक विश्वजित पाटील यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षप्रवेश झाला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जळगावात ठाकरेंचा गडाला सुरुंग लावला असल्याचे बोलले जात आहे. या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. मनोहर पाटील यांची शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळख आहे. डॉ. मनोहर पाटील यांनी १९९० मध्ये भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. पण यावेळी डॉ.मनोहर पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर १९९५च्या निवडणुकीवेळी शिवसेनेची जामनेरची जागा भाजपने मिळवली. तेव्हापासून डॉ. मनोहर पाटील यांना संधी मिळाली नाही. यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय मनोहर पाटील यांनी घेतला होता‌.

यादरम्यान, सुषमा अंधारे या शिवसंवाद यात्रेसाठी जळगावमध्ये उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. मनोहर पाटील आणि विश्वजित पाटील हे ठाकरे गटात होते. पण, आता ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या
काँग्रेसला मोठा धक्का! राज्यातील सर्वात मोठ्या नेत्याचे अचानक निधन; राहूल गांधी म्हणाले…
कोणत्याही पदावर नसताना सोमय्यांना FIR सर्वात आधी कशी मिळते? चौकशी करा, न्यायालयाचा दणका
महाराष्ट्र काॅंग्रेसमध्ये भूकंप! दिल्ली दरबारी मोठ्या हालचाली, ‘या’ बड्या नेत्याचे पद जाणार  

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now