Share

राहूल गांधींच्या सर्वात जवळचा ‘हा’ बडा नेता काॅंग्रेस सोडण्याच्या तयारीत; मोदींबाबत म्हणाला…

rahul-gandhi-sad.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे.

विरोधी पक्षांनी ‘अग्निपथ’ योजनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. या योजनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीका केली.  ‘केंद्राला तीन कृषी कायद्यांसारखंच ही योजनाही मागे घ्यावी लागेल,’ असं म्हणत राहुल गांधींनी म्हंटलं होतं. मात्र असं असताना देखील कॉंग्रेसच्या एका नेत्याने मात्र मोदींच्या अग्निपथ योजनेचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.

यामुळे राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी अग्निपथ (Agneepath) योजनेचे कौतुक केले आहे. त्यांनी या योजनेबाबत एक लेख देखील लिहीला आहे. लेखात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या अग्निपथ योजनेचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.

यामुळे आता राजकीय वर्तुळात त्याचबरोबर कॉंग्रेसच्या गोटात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मनिष तिवारी हे लवकरच कॉंग्रेसला झटका देणार असल्याच बोललं जातं आहे. देशाला बलशाली बनवायचे असेल तर अग्निपथ सारख्या काही योजनांची गरज असल्याचे तिवारी यांनी म्हटले होते.

तिवारी यांनी आपल्या लेखातून म्हंटलं आहे, ‘या योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देखील मिळणार आहे. मात्र तिवारी यांच्या या लेखावर काँग्रेसमधील काही नेत्यांकडून अक्षेप घेण्यात आला आहे. काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश यांनी या लेखाबाबत बोलताना म्हंटलं आहे की, तिवारी यांची ती व्यक्तीगत भूमिका आहे. त्याच्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही.

दरम्यान, तिवारी यांनी पक्षविरोधात भूमिका घेतल्याने सध्या राजकीय वर्तुळात तिवारी हे कॉंग्रेसला धक्का देणार असल्याच बोललं जातं आहे. मात्र यावर अद्याप तिवारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. त्याचबरोबर आणखी कॉंग्रेस नेत्यानी देखील प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या-
एका युक्तीने पालटले व्यक्तीचे नशीब, फळं विकून उभी केली तब्बल 300 कोटींची कंपनी, वाचा यशोगाथा
काशी विश्वनाथ मंदीरातून साईबाबांच्या मुर्त्या हटवा, महंतांचा आदेश; वाचा नेमकं काय घडलं..
राणादासाठी पाठकबाईंनी घेतला खास उखाणा; म्हणाली, फुलावर फिरत असतो भुंगा…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now