सेलिब्रिटी चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. बऱ्याचदा ते हटके लुकने चाहत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळा असे करणे त्यांना महाग सुद्धा पडते. आता असेच काही अभिनेत्री मंदाना करीमीसोबत घडले आहे. (mandana karimi burkha dance)
अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करीमी काही महिन्यांपूर्वी कंगना राणावतच्या ‘लॉक अप’ या रिऍलिटी शोमध्ये दिसली होती. त्या शोमध्ये वेगवेगळे टास्क दिले जात होते. तेव्हा तिने अनेक धक्कादायक खुलासे केले की ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.
आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका शॉपिंग मॉलमध्ये बुरखा घातलेली दिसत आहे. लोकांना तिची ही स्टाइल अजिबात आवडली नाही, त्यामुळे सोशल मीडियावर तिला लोकांनी चांगलेच सुनावले आहे. लोकांना इतका राग आला की, तु मुस्लिम असूनही हिजाबची खिल्ली उडवत आहे… लाज वाटायला पाहिजे, असे तिला लोकांनी म्हटले आहे.
इराणी अभिनेत्री मंदाना करीमीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तिने बुरखा घातला आहे. ती एका शॉपिंग मॉलमध्ये दिसत आहे. खरेदी करताना ती अचानक डान्स करू लागते. त्यानंतर शेवटी ती तिच्या चेहऱ्यावरुन बुरखा हटवते.
मंदानाचा हा डान्स लोकांना अजिबात आवडली नाही. या पोस्टवर अनेकांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हिजाबची अशी खिल्ली उडवू नका. असे काही करण्यापूर्वी एकदा विचार करा.’ अनेकांनी मंदानांने हिजाबची खिल्ली उडवल्यामुळे तिला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो करत असल्याचंही लिहिलं आहे.
मंदानाचा जन्म तेहरानमध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या ९व्या सीझनमध्येही ती दिसली होती आणि ती सेकंड रनर अप देखील होती. मंदानाने २०१६ मध्ये बॉयफ्रेंड गौरव गुप्तासोबत लग्न केले, जो मुंबईतील बिझनेसमन आहे.
https://www.instagram.com/reel/Ce5SP72JDn5/?igshid=YmMyMTA2M2Y=
त्या दोघांनी आधी कोर्टात लग्न केले आणि नंतर २०१७ मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले. त्याच वर्षी मंदानाने पती आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. ‘लॉक अप’ शोदरम्यान मंदानाने खुलासा केला होता की तिचा नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा खूप छळ केला होता.
महत्वाच्या बातम्या-
आजा ना राजा! पाकिस्तानच्या रेस्टॉरंटने आलियाच्या ‘त्या’ व्हिडीओचा जाहिरातीसाठी केला वापर, नेटकरी संतापले
तरुणांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी.., इस्त्रायलचे उदाहरण देत कंगनाचे अग्निपथ योजनेला समर्थन
कौतुकास्पद! मेंढ्या चारून १० वीत पाडले तब्बल ९२ टक्के, पडळकरांनीही केले कौतुक, म्हणाले…