कर्नाटकातील मंड्याच्या श्रीरंगपटनामधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरुणाने चक्क आपली अलिशान BMW X६ कार नदीत फेकली आहे. पोलिसांना ही कार चुकून नदीत पडली असे वाटल्याने पोलिस आणि स्थानिक लोक घाबरले होते. मात्र तरुणाने आपण स्वत:हून कार नदीत फेकल्याचे सांगितले आहे. (man thrown bmw car because of mother death)
आईच्या आकस्मिक निधनानंतर तो नैराश्यात गेला होता. त्यामुळे त्याने हे सर्व केल्याचे समोर आले आहे. गंजामजवळील कावेरीच्या मध्यभागी स्थानिक मच्छिमार आणि गावकऱ्यांनी लाल रंगाच्या BMW कारचे छत पाहिले. याची एक्स-शोरूम किंमत बेंगलोरमध्ये १.३ कोटी रुपये आहे.
गाडी बघताच तिथल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना बोलावले. आत कोणीतरी बसले असावे, असे पोलिसांना वाटले. हे पाहता गोतेखोरांना तातडीने बोलवण्यात आले. काही वेळाने गोताखोरांनी सांगितले की कारच्या आत कोणीही नाहीये आणि नंतर तिला नदीतून बाहेर काढण्यात यश आले.
वाहतूक अधिकार्यांच्या मदतीने पोलिसांना गाडीचा मालक बेंगलोरमधील महालक्ष्मी लेआउटचा रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी त्याची भेट घेतली आणि त्याची चौकशी केली. पण जेव्हा पोलिसांनी त्याची कहाणी ऐकली तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला.
तो खुप गोंधळेला आणि अस्वस्थ दिसत होता. पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे त्याला नीट देता येत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना बोलावले. आईच्या निधनानंतर तो डिप्रेशनमध्ये गेल्याचे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले.
दुःखातून बाहेर पडू न शकल्याने तो आपल्या कारमध्ये श्रीरंगपटना येथे आला आणि बेंगलोर परत येण्यापूर्वी निराशेने ती नदीत फेकली, असे श्रीरंगपट्टणाचे उपनिरीक्षक पुनीत यांनी स्पष्ट केले. नातेवाईकांच्या साक्षीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबाने कार परत बेंलगोरला नेली. या घटनेसंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या-
मला घटस्फोट हवाय, मी वैतागलोय; मुलाच्या जन्मानंतर भारतीच्या पतीची धक्कादायक मागणी
मांजरेकरांच्या ‘वीर सावरकर’चा पहिला लुक आला समोर; ‘हा’ बॉलिवूड स्टार साकारणार सावरकरांची भूमिका
विराटच्या खराब फॉर्मवर वीरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्य; म्हणाला, जितक्या चुका त्याने करीअरमध्ये केल्यात…