राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षातील नेते आपआपल्या पक्षाला लोकांनी निवडूण द्यावे, यासाठी प्रचार करत आहे. त्यामुळे पुणे भाजपने आघाडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यात आणलं आणि त्यांच्याकडून मेट्रोसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन करुन घेतले आहे. (man throught footwear on devendra fadanvis)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आज विरोक्षी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसही आज पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
पोलिसांनी पुन्हा शांततेचे वातावरण तयार करण्यासाठी लाठीमार सुरु केला होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या गाडीचा ताफाही तिथे आला होता. असे असताना आता एका अज्ञात व्यक्तीने या गोंधळात देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल मारुन फेकली आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरु केला.
देवेंद्र फडणवीसांवर चप्पल भिरकावल्यामुळे पिंपरीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा वाद आणखी वाढण्याची शक्यताही आहे. उद्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. याचदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.
त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यांचा ताफा तिथे आला. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने गाडीवर चप्पल फेकून मारली. भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरु केला होता. गेल्या पाच वर्षात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भष्ट्राचार झाला असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर चप्पल फेकून मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच पिंपरी पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहे. अशात राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे, त्यामुळे आता भाजप हा मुद्दा अधिवेशनात मांडणार असे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवरायांबाबत वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना अजित पवारांनी झाप झाप झापले, म्हणाले…
वाहने उचलून नेणार नाही! मुंबईच्या नवीन पोलीस आयुक्तांचे मुंबईकरांना खास गिफ्ट, पण ‘ही’ अट लागू
ह्रदयद्रावक! बर्फ वितळवून तहान भागवत आहेत भारतीय विद्यार्थी, सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल