सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप व्हायरल होत आहे आणि यामध्ये दाखवण्यात आले आहे की कशा प्रकारे एका व्यक्तीचे शरीर पिवळे पडले आहे. या माणसाने मागील ३० वर्षांपासून रोज धूम्रपान म्हणजे सिगरेट ओढली होती असे बोलले जात आहे.
चिनी सोशल मीडियावर या फोटो झपाट्याने व्हायरल होत आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार ६० वर्षीय हा व्यक्ती ज्याचे नाव फक्त ड्यु आहे, त्याने सतत ३० वर्षे धूम्रपान केले आहे. २७ जानेवारीला या व्यक्तीला चीनमधील हुआयेन या शहरातील एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांचे पूर्ण शरीर हळूहळू पिवळे पडू लागले. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी जेव्हा त्यांचे चेकअप केले तेव्हा त्यांना दिसले की ड्यु यांच्या पॅनक्रियाजमध्ये खूप मोठा ट्युमर झाला होता.
हा ट्युमर इतका मोठा होता की त्यांच्या पित्तनलिका ब्लॉक झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या शरीरात बिलिरुबिन निर्माण झाले होते. हे एक पिवळ्या रंगाचे द्रव्य असते जे रक्ताच्या पेशी फुटल्यानंतर तयार होते. डॉक्टर म्हणाले की, जास्त प्रमाणात धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे त्यांचा ट्युमर वाढला.
त्यांना पिलिया हा रोग झाला होता. पिलिया हा रोग शरीरात बिलिरुबिन जास्त प्रमाणात वाढल्याने होतो. यामुळे त्वचेचा रंग बदलतो आणि डोळ्यांचा रंगदेखील पिवळा होतो. ड्युचे नशीब चांगले होते की डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यांचा त्वचेचा रंग परत आणला आणि त्यांच्या ट्युमरचे ऑपरेशन करण्यात आले.
ऑपरेशननंतर त्यांचा ट्युमर हटवण्यात आला. त्यांना धूम्रपान आणि मद्यपान सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यांचे वय सध्या ६० वर्षे आहे. जर ड्यु यांनी धूम्रपान आणि मद्यपान सोडले तरच त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
‘मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईची भेट घेऊन ये’, योगींच्या बहिणीची भावुक विनंती
रोज रात्री गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून यायचा दुर्गंध; फरशी तोडताच समोर आलं थरकाप उडवणारं सत्य
काळीज चिरणारी घटना! भावाला झोका देत असताना भावा-बहिणीवर काळाचा घाला
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली तर सोनं करून दाखवेन- रुपाली पाटील ठोंबरे