याच वर्षी ऑगस्टमध्ये ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने लॉटरीमध्ये 28 कोटींचा बंगला जिंकला होता. त्यांनी लकी ड्रॉमध्ये 2 हजार रूपयांची पैज लावली होती. पण आता त्याला तो बंगला विकायचा आहे. खरंतर तो म्हणाला की, सध्या तो ज्या घरात राहतो तेच घर त्याच्यासाठी चांगलं आहे.
नवीन बंगल्यातील जीवन त्याला आवडत नाही. त्याला हा नवा बंगला 4 मिलियन पौंड म्हणजेच 37 कोटींना विकायचा आहे. उत्तम परमार आणि त्यांचे कुटुंब ब्रिटनमधील लीसेस्टर येथे राहते. परमार आणि त्यांची पत्नी राखी लॉटरी जिंकल्यानंतर आठ आठवड्यांनीच घर विकत आहेत.
परमार यांच्या कुटुंबीयांनी लीसेस्टरशायर येथील त्यांच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ब्रिटीश वृत्तपत्र डेली मेलला सांगितले की, ते नवीन घरात फिट बसत नव्हते आणि त्यांना त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नव्हता. उत्तम परमार म्हणाले की, ऍपलबाय मॅग्ना, लीसेस्टरशायर येथील त्यांच्या मोठ्या शांत आणि प्रशस्त आधुनिक लाल-विटांच्या वेगळ्या घरात राहून ते खूप समाधानी आहेत.
परमार आपल्या बक्षीसामध्ये मिळालेल्या घराबद्दल म्हणाले की, हे एका सुंदर ठिकाणी एक उत्तम घर आहे, परंतु कॉर्निश किनार्यावरील अनेक श्रीमंत लोकांसोबत आम्ही फिट बसतो असे आम्हाला वाटत नाही. आम्ही बऱ्याच दिवसांपासून लीसेस्टरमध्ये राहत आहोत आणि आम्ही खुश आहोत. आम्हाला 4 दशलक्ष हॉलिडे होम्सची गरज नाही.
वॉटरहाऊस एक खुली राहण्याची जागा आणि अत्याधुनिक स्वयंपाकघर आणि जेवणाचे खोलीने सुसज्ज आहे. घराच्या मुख्य बेडरूममध्ये स्वतःचे डीलक्स बाथरूम आहे आणि इतर तीन बेडरूम्स सर्व डबल बेड आहेत. परमार यांचा २७ वर्षीय मुलगा लंडनमध्ये काम करतो.
परमार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘मी नेहमीच स्वत:ला भाग्यवान व्यक्ती मानतो कारण माझ्या कुटुंबामुळे मी टीव्ही कॉफी टेबलसारख्या अनेक गोष्टी जिंकल्या आहेत. मी हे प्रामाणिकपणे आणि आनंदाने सांगतो, असे ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
Levi Jeans: ६२ लाखांना विकल्या गेल्या १०० वर्षे जुन्या फाटलेल्या २ जीन्स, असं काय खास होत्या त्या जीन्समध्ये?
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…
PHOTO: कतरिनाने विकीसोबत साजरा केला पहिला करवा चौथ, लाल रंगाच्या साडीत दिसत होती खुपच सुंदर
Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी चूक; प्रसिद्ध लेखकाला जिवंतपणीच वाहीली श्रद्धांजली