Share

नेदरलँडहून भारत फिरायला आली होती महिला, आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली केला बलात्कार

गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. राजस्थानमधून तर अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहे. असे असतानाच आता राजस्थानच्या जयपूरमधून एक भयानक प्रकार समोर आला आहे. (man rape nethareland women)

राजस्थानमधील जयपूरमध्ये एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ज्या महिलेवर बलात्कार झाला ती महिला मूळची नेदरलँडची आहे. ती राजस्थानमध्ये फिरण्यासाठी आली होती. त्यामुळे ती जयपूरच्या एका हॉटेलमध्ये राहत होती.

आता जयपूरमधील एका हॉटेलमध्ये आयुर्वेदिक मसाजच्या बहाण्याने एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांना तिने शुक्रवारी याबाबत माहिती देत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही घटना बुधवारी घडली असून आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, अज्ञात आरोपीने सिंधी कॅम्पजवळील हॉटेलमध्ये आयुर्वेदिक मसाज सुरू असताना महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने गुरुवारी सायंकाळी सिंधी कॅम्प पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ३७६ अन्वये तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिजू मुरलीधरन याला शुक्रवारी अटक करण्यात आली. मुरलीधरन हा मूळचा केरळचा रहिवासी असून तो खातीपुरा भागात भाड्याच्या घरात राहतो. सिंधी कॅम्पचे एसएचओ गुंजन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडितेने आरोपीला आयुर्वेदिक मसाजसाठी तिच्या कुटुंबियांसोबत राहण्याच्या ठिकाणी बोलावले होते. तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! गोव्यातील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीलाही अटक
महेंद्रसिंग धोनी नंबर ७ ची जर्सी का घालतो? स्वत:च सांगितली जर्सीमागची इनसाईड स्टोरी
“शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे गोपीचंद पडळकरांना कळून चुकलं आहे”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now