Share

तोंडात पेट्रोल भरून स्टंट करणं पडलं महागात, दाढीला लागली आग, पहा भयानक व्हिडीओ

लोकं आगीचे खेळ दाखवतात. काही लोकांचे पोट त्यावरच चालते. आगीचे खेळ दाखवून ते पैसे कमावतात. पण आगीशी खेळणे काही जणांच्या जीवावर बेतलेले आपण अनेकवेळा पाहिलं आहे. जेव्हा स्टंट योग्य पद्धतीने केला जात नाही तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर बनते.

याचे उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक माणूस तोंडात पेट्रोल घेऊन आगीशी खेळत असताना त्याच्या दाढीला आग लागली. यानंतर आजूबाजूला उपस्थित नागरिकांनी कशीतरी आगीवर नियंत्रण मिळवून तरुणाला वाचवले नाहीतर त्याचे काही खरे नव्हते.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणांचा जमाव दिसत आहे, त्यापैकी एक स्टेजवर उभा आहे आणि हातात मशाल आहे. तो दुसऱ्या व्यक्तीकडून पेट्रोलची बाटली मागतो. यानंतर, तोंडात थोडेसे पेट्रोल भरतो आणि मशालीवर जोरदार फुंकर मारतो.

मशालीवर जोरदार फुंकर मारल्यानंतर आगीचा भडका होतो. पण यादरम्यान माणसाच्या दाढीला आग लागते. तो आपल्या हातांनी आग विझवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रकरण गंभीर होते. अशा स्थितीत शेजारी उभी असलेली मुलं त्या व्यक्तीकडे धाव घेतात आणि हाताने आग आटोक्यात आणतात.

हा व्हिडिओ ravipatidar603 या Instagram वापरकर्त्याने शेअर केला आहे, या व्हिडीओला आतापर्यंत 1 कोटी 23 लाख व्ह्यूज आणि 6 लाख 80 हजार लाईक्स मिळाले आहेत. यासह शेकडो युजर्सनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कमेंट सेक्शन पाहिल्यास काही युजर्सनी आगीशी खेळू नका, नाहीतर भाजून जाल असे लिहिले आहे. त्याचबरोबर स्वत:च्या हाताने आग विझवण्याचे काम करणाऱ्या माणसाचे अनेकांनी कौतुक केले आहे. युजर्सनी लिहिले की, सर्व लोकांना सोडा, पण या आग विझवणाऱ्या मित्रांना कधीच सोडू नका, अशी माणसं भेटत नाहीत.

महत्वाच्या बातम्या
Dinesh Karthik : दिनेश कार्तिक वर्ल्डकपमधून होणार बाहेर, स्वत: भुवनेश्वर कुमारने खुलासा करत सांगितले मोठे कारण
bachu kadu : एकनाथ शिंदे नव्हे तर ‘या’ नेत्याच्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले; झाला धक्कादायक गौप्यस्फोट
IND VS SA : ‘आपको लाहौर छोड आए’, भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानची घेतली फिरकी, पहा भन्नाट मीम्स
Yuzvendra Chahal : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात चहलने अंपायला मारल्या लाथा बुक्क्या, व्हिडीओ झाला व्हायरल

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now