लोकं आगीचे खेळ दाखवतात. काही लोकांचे पोट त्यावरच चालते. आगीचे खेळ दाखवून ते पैसे कमावतात. पण आगीशी खेळणे काही जणांच्या जीवावर बेतलेले आपण अनेकवेळा पाहिलं आहे. जेव्हा स्टंट योग्य पद्धतीने केला जात नाही तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर बनते.
याचे उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक माणूस तोंडात पेट्रोल घेऊन आगीशी खेळत असताना त्याच्या दाढीला आग लागली. यानंतर आजूबाजूला उपस्थित नागरिकांनी कशीतरी आगीवर नियंत्रण मिळवून तरुणाला वाचवले नाहीतर त्याचे काही खरे नव्हते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणांचा जमाव दिसत आहे, त्यापैकी एक स्टेजवर उभा आहे आणि हातात मशाल आहे. तो दुसऱ्या व्यक्तीकडून पेट्रोलची बाटली मागतो. यानंतर, तोंडात थोडेसे पेट्रोल भरतो आणि मशालीवर जोरदार फुंकर मारतो.
मशालीवर जोरदार फुंकर मारल्यानंतर आगीचा भडका होतो. पण यादरम्यान माणसाच्या दाढीला आग लागते. तो आपल्या हातांनी आग विझवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रकरण गंभीर होते. अशा स्थितीत शेजारी उभी असलेली मुलं त्या व्यक्तीकडे धाव घेतात आणि हाताने आग आटोक्यात आणतात.
हा व्हिडिओ ravipatidar603 या Instagram वापरकर्त्याने शेअर केला आहे, या व्हिडीओला आतापर्यंत 1 कोटी 23 लाख व्ह्यूज आणि 6 लाख 80 हजार लाईक्स मिळाले आहेत. यासह शेकडो युजर्सनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कमेंट सेक्शन पाहिल्यास काही युजर्सनी आगीशी खेळू नका, नाहीतर भाजून जाल असे लिहिले आहे. त्याचबरोबर स्वत:च्या हाताने आग विझवण्याचे काम करणाऱ्या माणसाचे अनेकांनी कौतुक केले आहे. युजर्सनी लिहिले की, सर्व लोकांना सोडा, पण या आग विझवणाऱ्या मित्रांना कधीच सोडू नका, अशी माणसं भेटत नाहीत.
महत्वाच्या बातम्या
Sachin tendulkar : याला म्हणतात साधेपणा! क्रिकेटच्या देवाने टपरीवाल्याचा चहा घेतला अन् त्याची इच्छाही पुर्ण केली
Sachin tendulkar : आपल्या मुलाचं टीम इंडियात सिलेक्शन व्हावं म्हणून सचिन तेंडुलकरने ‘या’ देवाला घातलं साकडं
IND and PAK : भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होणार? जाणून घ्या संपुर्ण गणित
Sachin tendulkar : क्रिकेटच्या देवाचा साधेपणा! रस्त्यावर चहा पिला, टपरीवाल्यासोबत सेल्फी घेतली अन् टिपही दिली