नुकताच प्रदर्शित झालेला काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरबाहेर लोकांची गर्दी होत आहे. अनेकांना तर तिकीटही मिळत नाहीये. असे असताना आता या चित्रपटाच्या नावाखाली एक धक्कादायक प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. (man lost 30 lakh for the kashmir files)
आता सायबर गुन्हेगारांना चित्रपटाच्या नावाचा वापर करून स्मार्टफोन वापरकर्त्यांना फसवण्याची संधी मिळाली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की नोएडाचे अतिरिक्त उपायुक्त रणविजय सिंह यांनी ‘द काश्मीर फाइल्स’शी संबंधित व्हॉट्सऍप स्कॅमबद्दल मोबाईल वापरकर्त्यांना एक इशारा दिला आहे.
त्यांनी वापरकर्त्यांना सांगितले आहे की, जोपर्यंत त्यांना चित्रपटाच्या सत्यतेबद्दल खात्री होत नाही, तोपर्यंत चित्रपटाच्या नावासंबंधी व्हॉट्सऍपवर आढळलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. अतिरिक्त उपायुक्त रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीशी संबंधित काही तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
द काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या परिस्थितीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सऍपवर चित्रपट मोफत डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकजण या सायबर गुन्हेगारीला बळी पडत आहे.
व्हॉट्सऍपवर मिळालेल्या या लिंकवर एखाद्या व्यक्तीने क्लिक करताच, फसवणूक करणाऱ्यांना वापरकर्त्याच्या फोनची माहिती मिळते. त्यानंतर ते सहजपणे वैयक्तिक माहिती चोरतात. रणविजय सिंह यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे.
सर्वप्रथम, फसवणूक करणारे लोक व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवतात आणि या लिंकसोबत एक मेसेज असतो. ज्यामध्ये म्हटले आहे की लोक लिंकवर क्लिक करून काश्मीर फाइल्स चित्रपट तुम्ही विनामूल्य डाउनलोड करू शकतात. कोणताही वापरकर्ता लिंकवर क्लिक करताच, मालवेअर वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमध्ये जातो.
मालवेअर नंतर वापरकर्त्याचे बँकिंग तपशील चोरण्याचे काम करतो. रणविजय सिंह यांनी स्मार्टफोन वापरकर्त्यांना सल्ला दिला आहे की, व्हॉट्सऍपवर अशी कोणतीही लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका. २४ तासांत तीन लोक पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि सर्वांनी सायबर फ्रॉडची तक्रार दाखल केली, तिन्ही लोकांचे एकूण ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शाबास गं रणरागिणी! बैलगाडा जुंपणाऱ्या मुलीचे अमोल कोल्हेंनी केले कौतुक; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
‘या’ कारणामुळे अभिनेते राजकुमार यांच्यावर गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले होते
लोक माझा तिरस्कार करताहेत, मला शिव्या देताहेत, पण त्यामुळे मी आनंदी आहे; अभिनेत्याचे वक्तव्य