Share

Kolhapur : लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून ३ मुलांच्या आईची निर्घुन हत्या, वाचून तुम्हालाही बसेल जबर धक्का

Kolhapur : कोल्हापुरमधून एक धक्कादायक घटना  समोर आली आहे. तरूणाने एका महिलेचा सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. ही घटना कसबाबावडा लाईन बाजार या परिसरात घडली आहे. कविता प्रमोद यादव (वय ४४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पोलीस व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपी राकेश शामराव संकपाळ (वय ३२) हा स्वता पोलीस मुख्यालयातील एलसीबीमध्ये हजर झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लग्नास नकार दिल्याने त्याने हा खून केल्याचे सांगितले आहे.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता ही कसबा तारळे येथील रहिवासी होती. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. चार वर्षांपुर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. मावसभावाच्या फुटवेअरच्या दुकानात त्या कामाला होत्या. तसेच त्या शिवणकामही करायच्या.

अविवाहीत राकेश संकपाळ याच्याशी त्यांचे प्रेमसंबंध होते. तो ही नात्यातीलच होता. दोघांच्याबद्दल त्यांच्या घरच्यांनाही माहिती होतं. राकेशने तिच्यामागे लग्न करण्याचा हट्ट धरला होता. पण त्यांनी लग्नास नकार दिला होता. रविवारी सकाळी राकेशने आईवडिलांना देवदर्शनाला गावी पाठवले होते.

भाऊ कामाला गेला होता. त्यावेळी कविता मावस भावासोबत त्याच्या घरी आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मावस भाऊ तारळेला निघून गेला. दुपारी राकेशने पुन्हा त्यांच्याकडे लग्नाचा हट्ट धरला. पण कविता यांनी तीन मुलं असल्यामुळे लग्नास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये भांडणं झाली.

रागाच्या भरात त्याने घरातील कोयता उचलला आणि कवितावर सपासप वार केले. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. खून केल्यानंतर राकेश संकपाळ स्वताहून पोलीस मुख्यालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात हजर झाला होता. त्याने खून केल्याची कबूलीही दिली.

त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच त्यांना धक्काच बसला. तेथील दृष्य भयानक होते. कविताच्या गळ्यावर आणि मानेवर वार करण्यात आले होते. भिंती रक्ताने माखलेल्या होत्या. त्याचा शर्टही रक्ताने भरलेला होता. त्या अवस्थेत तो पोलिसांसमोर हजर झाला होता.

महत्वाच्या बातम्या
chandni chowk : कोणी बांधला होता चांदणी चौकातला पूल? काय होता त्या पुलाचा ३० वर्षांचा इतिहास? वाचा सविस्तर
Suraj Pawar : फसवणूकीच्या गुन्ह्याबाबत अखेर सैराटफेम प्रिन्सने सोडले मौन; म्हणाला, माझे एवढे धिंडवडे…
shivsena : एकनाथ शिंदेंचा पुन्हा घराणेशाहीकडे कल : शिवसेना सचिवपदी केली ‘या’ नेत्याच्या मुलाची नियुक्ती
bjp : भाजपने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसत शिंदेगटच फोडला; वाचा काय घडलं..  

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now