Share

ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली झाली जेल, तीच पत्नी 12 वर्षांनंतर प्रियकरासोबत सापडली

अमेठीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नवऱ्याला कोणताही गुन्हा केलेला नसताना तुरूंगवास भोगावा लागला आहे. ज्या पत्नीच्या आरोपाखाली पतीला तुरूंगवास भोगावा लागला ती पत्नी तब्बल 12 वर्षांनंतर अचानक भेटली. रायबरेली जिल्ह्यातून पतीला पत्नी सापडली. त्यामुळे आता त्या व्यक्तीचे कुटुंबीय पतीला न्याय मिळवून देण्याची  मागणी करत आहेत.

हे संपूर्ण प्रकरण अमेठी जिल्ह्यातील जैस पोलीस ठाण्याच्या अली नगर भागातील आहे. जिथे मनोज कुमार वर्मा पत्नी सीमा वर्मासोबत राहत होते. 25 मार्च 2011 रोजी तरुणाची पत्नी सीमा वर्मा अचानक गायब झाली. खूप शोध घेऊनही पत्नी सापडली नाही.

मनोजच्या सासरच्यांनी सीमा वर्माचा पती मनोज वर्माविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याच्यावर स्वत:च्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवल्याचा आरोप केला. त्यानंतर मनोजला 11 दिवस तुरुंगवास भोगावा लागला. कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर मनोज कास्तर हा त्याच्या पत्नीचा शोध घेत होता.

यासोबतच या प्रकरणाबाबत ते न्यायालयाच्या चकरा मारत होते. त्याचवेळी 11 वर्षांनंतर 10 जानेवारी 2023 रोजी मनोजला त्याची पत्नी जिवंत असल्याची माहिती मिळाली. मनोजने याबाबत चौकशी केली असता त्याला समजले की, त्याची पत्नी आपल्या तीन मुलांसह तिच्या पालकांच्या घरी राहते.

त्यानंतर मनोजने रायबरेली जिल्ह्यातील भडोखर पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पत्नीचे जबाब घेऊन अन्य कायदेशीर कारवाई केली. पीडितेचा पती मनोजने सांगितले की, त्यांची पत्नी सीमा ही रायबरेली येथील रहिवासी असून, 12 वर्षांपूर्वी एका व्यक्तीसोबत पळून गेली आणि तिचे लग्न झाले.

हे माहीत असतानाही त्यांच्या कुटुंबीयांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला. 12 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यामुळे आमचे खुप नुकसान झाले आहे. आम्हाला निर्दोष सिद्ध करता यावे यासाठी पत्नीने न्यायालयात येऊन सगळी हकीकत सांगावी अशी मागणी त्याने केली आहे.

पत्नी जिवंत सापडल्यानंतर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. पत्नीच्या कुटुंबीयांनी लावलेले आरोपही निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या आरोपामुळे पतीला 11 दिवस तुरुंगवास भोगण्याव्यतिरिक्त न्यायासाठी 12 वर्षे न्यायालयात जावे लागले. तिलोई सर्कलचे सीओ अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, अर्ज रायबरेलीमध्ये देण्यात आला आहे. पोलीस पुढील तपासात गुंतले आहेत.

महत्वाच्या बातम्या
सूर्या, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर महाकालेश्वरच्या दर्शनाला; पंतच्या प्रकृतीसाठी घातले साकडे
‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी गणेशमूर्ती, किंमत आहे 500 कोटींहून अधिक; वाचा खास वैशिष्टे
‘मुसलमान असल्यामुळे सिकंदरसोबत…’; कुस्तीसम्राट अस्लम काझींच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
‘मी मुस्लीम असूनही माझ्या तालमीला छत्रपती शिवरायांचे नाव, कुस्तीला जातीय रंग देऊ नका’

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now