भारतात अनेक अशी मंदिरे आहेत, जिथे भक्त हजारो, लाखो रुपये दान करत असतात. अनेकदा भक्त आपल्या देवी-देवतांसाठी सोन्याचे अलंकारही अर्पण करत असतात. पण काही वेळा भक्त असे काही दान करतात, ज्यामुळे ते चर्चेत येतात. आता असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. (man donate 60 kg gold in kashi vishwanath temple)
काशी विश्वनाथ मंदिराला एका भक्ताने ६० किलो सोने दान केले आहे. त्यापैकी ३७ किलो सोने गर्भगृहाच्या आतील भिंतींवर वापरण्यात आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वी एका भाविकाने मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला होता आणि त्याने ६० किलो सोने दिले होते. मात्र, त्याने सर्वांसमोर नाव सांगण्यास नकार दिला आहे.
मंदिर प्रशासनाचे अधिकारी दीपक अग्रवाल यांनी सांगितले की, एका अज्ञात भक्ताने मंदिरात ६० किलो सोने अर्पण केले आहे. यापैकी ३७ किलो गाभाऱ्याच्या आतील भिंतींवर वापरण्यात आले आहे. त्या सोन्यापैकी अजूनही २३ किलो सोने शिल्लक आहे.
१३ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केले. यापूर्वीच हा भाविक मंदिर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. त्याच्या देणगीनंतर मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दान केलेल्या सोन्याचा वापर गर्भगृहाची आतील भिंत आणि मुख्य मंदिराच्या घुमटाचा खालचा भाग झाकण्यासाठी केला जाईल अशी योजना तयार केली होती.
अधिकारी दीपक अग्रवाल म्हणाले, हे काम पूर्ण करण्यासाठी दिल्लीत असलेली एक कंपनी तयार होती. त्यामुळे त्या फर्मच्या कारागिरांनी गर्भगृहाच्या भिंती ताम्रपत्रांच्या साहाय्याने तयार केल्या. ते भिंतीला लावल्यानंतर त्यावर सोन्याचा मुलामा चढवण्याची प्रक्रिया करण्यात आली.
१८ व्या शतकानंतर मंदिराच्या कोणत्याही भागावर सोन्याचा मुलामा चढवण्याचे हे दुसरे सर्वात मोठे काम आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या इतिहासानुसार, १७७७ मध्ये इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली होती. त्यानंतर पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी मंदिराच्या दोन घुमटांना झाकण्यासाठी सुमारे एक टन सोने दान केले होते.
महत्वाच्या बातम्या-
पत्नीला प्रियकरासोबत पाहून भडकला पती; केले असे काही कृत्य की वाचून हादरल
पत्नीच्या ‘या’ सवयीला कंटाळून युवराज सिंगने उचलले होते टोकाचे पाऊल, केला होता तिचा नंबर डिलीट
पुण्यात ट्रेकिंग करताना लहान मुलांवर मधमाश्यांनी केला हल्ला, 19 मुली 2 मुलांची प्रकृती गंभीर